खेड (प्रतिनिधी) - सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या विशेष प्रसंगी, 14 एप्रिल ते 20 एप्रिल 2026 या सप्ताहादरम्यान एटीएल कम्युनिटी डे’ रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न्न झाला. सदर कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाईतवाडीच्या सहाय्यक शिक्षिका प्रियांका चाळके, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, देवयानी महाजन यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. तद्नंतरशाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाईतवाडीच्या सहाय्यक शिक्षिका प्रियांका चाळके यांचे पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आले.
‘एटीएल कम्युनिटी डे’ - टिंकरफेस्ट 2026 हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर एटीएलची दारे समाजासाठी खुली करण्याची, कुतूहल जागृत करण्याची आणि शाळेच्या परिघाबाहेरील विद्यार्थ्यांमध्ये नाविन्याचा वसा रुजवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. यामध्ये जवळच्या शाळांमधील विद्यार्थी, स्थानिक नागरिक, शिक्षक आणि तरुण संशोधक व नवप्रवर्तक यांना सहभागी करून घेऊन नाविन्य, सर्वसमावेशकता आणि कृती-आधारित शिक्षणाची एक पोषक परिसंस्था निर्माण करणे, हे 'एटीएल कम्युनिटी डे’ चे मुख्य उद्दिष्ट होते. याअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाईतवाडीतील इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमधील रोबोटिक्स विषय शिक्षक प्रणित मेस्त्री आणि समिरा नरवणकर यांच्या मदतीने 'स्मार्ट टोलगेट प्रतिकृती' तयार केली. अटल टिंकरिंग लॅब (एटीएल) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान, डिझाइन, थिंकिंग आणि समस्या निराकरण कौशल्यांचा वापर करून सर्जनशीलपणे आणि नवनिर्मिती केली. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल नरवणकर यांनी केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या अनोख्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
























1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.