loader
Breaking News
Breaking News
Foto

कळंबोलीत साकारणार आधुनिक संसर्गजन्य रुग्णालय, उपमहापौर प्रमिला पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल - कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेल्या आरोग्य संकटातून धडा घेत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात संसर्गजन्य आजारांवर उपचार करणारे आधुनिक रुग्णालय उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामागे उपमहापौर प्रमिला पाटील यांचा सातत्यपूर्ण आणि ठाम पाठपुरावा निर्णायक ठरला असून त्यांच्या पुढाकारातून कळंबोली येथे सुसज्ज संसर्गजन्य रोग रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत त्यांनी मांडलेली ही मागणी आता प्रत्यक्षात उतरत असून पनवेलच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे. उपमहापौर प्रमिला पाटील यांनी कळंबोली येथे आधुनिक संसर्गजन्य रोग रुग्णालय उभारण्याचा मुद्दा केवळ घोषणा न ठेवता तो प्रशासनाच्या कार्यसूचीत अग्रक्रमावर आणण्यासाठी सातत्यपूर्ण आणि ठोस पाठपुरावा केला. त्यांनी आरोग्य विभागासोबत झालेल्या अनेक बैठका, प्रस्ताव सादरीकरण, स्थानिक नागरिकांच्या गरजांचे मुद्देसूद मांडणीकरण आणि धोरणात्मक आग्रह या माध्यमातून हा विषय निर्णायक टप्प्यावर नेला. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने या प्रकल्पाला अधिकृत मंजुरी देत हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पाचे स्थान हे कळंबोली सेक्टर ५ई, प्लॉट क्रमांक ९ येथे उभारले जाणार आहे. कळंबोली हे नवी मुंबई–पनवेल परिसरातील अत्यंत वर्दळीचे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने वेगाने वाढणारे क्षेत्र असल्याने येथे आरोग्य सुविधांचा विस्तार अत्यंत आवश्यक मानला जात होता. या ठिकाणी रुग्णालय उभारल्यामुळे पनवेल, खारघर, तळोजा, कामोठे आणि आसपासच्या भागातील नागरिकांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे रुग्णालय पारंपरिक आरोग्य केंद्र नसून पूर्णपणे सुसज्ज संसर्गजन्य रोग व्यवस्थापन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण ५० खाटांची क्षमता असणार आहे, ज्यात ४२ ऑक्सिजनयुक्त खाटा आणि ६ अतिदक्षता खाटांचा समावेश असेल. या रुग्णालयात स्वतंत्र आपत्कालीन उपचार विभाग संसर्ग नियंत्रणासाठी विशेष आयसोलेशन व्यवस्था आधुनिक व्हेंटिलेटर व मॉनिटरिंग प्रणाली तातडीच्या प्रयोगशाळा व निदान सुविधा, प्रशिक्षित वैद्यकीय व परिचारिका कर्मचारी वर्ग, औषध व आपत्कालीन औषधसाठा युनिट, या सर्व सुविधांमुळे महामारी किंवा संसर्गजन्य उद्रेकाच्या काळात जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. हे रुग्णालय केवळ कोविडसारख्या एका आजारापुरते मर्यादित न राहता विविध संसर्गजन्य आजारांवर उपचार करण्यासाठी कार्यरत राहणार आहे. यामध्ये स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया, हिपॅटायटिस बी, इन्फ्लूएंझा, चिकनपॉक्स, निमोनिया आणि टायफॉईड यांसारख्या आजारांवर विशेष उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत. कोरोना काळात कळंबोली येथील समाज मंदिरात तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेले रुग्णालय अनेक रुग्णांसाठी जीवनरेखा ठरले होते. त्या अनुभवातून प्रशासनाला हे स्पष्ट झाले की आपत्कालीन आरोग्य व्यवस्था तात्पुरती न ठेवता कायमस्वरूपी स्वरूपात उभारणे आवश्यक आहे.

टाइम्स स्पेशल

यासाठी सेक्टर १८ (क) येथे ‘हिरकणी’ माता व बाल रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या केंद्रातप्रसूती व मातृत्व सेवा नवजात शिशु काळजी विभाग लसीकरण व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवास्त्रीरोग तज्ज्ञ सेवा बालरोग उपचार व पोषण सल्ला केंद्र या उपक्रमामुळे महिला व बाल आरोग्य व्यवस्थेला स्वतंत्र आणि सक्षम आधार मिळणार आहे. पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आमचे मार्गदर्शक परेश ठाकूर यांच्या सामाजिक जाणीवेतून सातत्यपूर्ण लोकहितकारी पाठपुराव्यामुळे कळंबोली येथे आधुनिक संसर्गजन्य रोग रुग्णालय उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हा प्रकल्प पनवेल परिसरातील आरोग्य सुविधांना नवे बळ देणारा ठरणार असून भविष्यातील आरोग्य आपत्तींसाठी शहराला अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनविणाऱ्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे उपमहापौर प्रमिला पाटील यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg