loader
Breaking News
Breaking News
Foto

अशोक खरात आणि आमदार केसरकर यांच्या नात्याची चौकशी करा, उबाठा शिवसेनेची मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) - भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचे नेमके संबंध काय आहेत? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकार्‍यांमार्फत निवेदन देण्यात येणार असून, केसरकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही निवेदनाद्वारे केली जाणार आहे, असे सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उबाठा शिवसेनेचे माजी सभापती रमेश गावकर, तालुकाप्रमुख राजू शेटकर, तालुकाप्रमुख रमेश सावंत, विनोद काजरेकर, विनोद ठाकूर, गुरुनाथ नाईक, प्रशांत बुगडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत कासार म्हणाले की, आमदार केसरकर यांनी विकासकामांकडे दुर्लक्ष करून केवळ निवडणुका आल्या की भोंदूगिरी आणि बुवाबाजीचा आधार घेत जनतेची दिशाभूल केली आहे. भोंदू अशोक खरात सोबत त्यांचे फोटो असून, या प्रकरणात समोर आलेले खुलासे विसंगत वाटत आहेत. सत्तेतील ९ मंत्र्यांचा यात सहभाग असल्याचे बोलले जात असून, खुद्द मुख्यमंत्र्यांचेही फोटो खरातसोबत आहेत. एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीला नेण्यामागे आणि खरातपर्यंत पोहोचवण्यामागे केसरकर यांचाच हात असल्याचा आरोपही केला जातो असे कासार यांनी यावेळी सांगितले. कासार पुढे म्हणाले की, आम्ही कोणत्याही भोंदूगिरीला मानत नाही. मात्र, या प्रकरणात स्त्रियांचे झालेले शोषण आणि इतर गैरप्रकार अत्यंत घृणास्पद आहेत. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे झाल्यास अनेक बड्या धेंडांची नावे समोर येतील. आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या खरातसोबतच्या फोटोबाबत विचारले असता, त्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडीत रामराज्य आणण्याचे स्वप्न दाखवणार्‍या केसरकरांमुळे मतदारसंघाचे नाव खराब होत आहे. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करून आमदारकी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून प्रांताधिकार्‍यांना निवेदन देणार आहोत, असेही कासार यांनी यावेळी सांगितले. हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवा अशी मागणी करणार आहोत. उद्या मंगळवार दि.२४ मार्च रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत बापूसाहेब महाराज पुतळा येथे सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. कासार यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg