loader
Breaking News
Breaking News
Foto

जल महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नळपाणी पुरवठा योजना महिला बचतगटाकडे सुपूर्द

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागरमध्ये जागतिक जलदिनाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जातात. यावर्षीची संकल्पना ही पाणी आणि लिंगभाव यावर आधारित होती. जास्तीत जास्त महिला व मुलींना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण करणे हा उद्देश होता. राज्य शासनाने दिनांक ८ मार्च ते २२ मार्च या कालावधीमध्ये जल महोत्सव साजरा करण्या बाबत सूचित करण्यात आले होते. त्यामध्ये जल अर्पण दिवस साजरा करून योजना गावाकडे सुपुर्द केली जाते त्या पार्श्वभूमीवर स्वामीत्वाचा उत्सव साजरा केला जातो. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नळ पाणी पुरवठा योजना स्वयंसहाय्यता महिला बचत गटाकडे सुपुर्द करणेबाबत ग्रामपंचायत खामशेत ता.गुहागर जि. रत्नागिरी यांचेशी चर्चा केल्यानंतर सदरची योजना श्री दत्तकृपा स्वयंसहाय्यता महिला बचतगट खामशेत गुहागर यांचेकडे करार तत्वावर सोपवणेत आली. यावेळी पं.स.चे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे तसेच पंचायत समितीचे सदस्या श्रीम. खैर व शिवगण तर कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. शिरसाट, उपअभियंता दिप्ती धारप, विस्तार अधिकारी शरद भांड, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, प्रशासक श्री. सोलकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. मोहीरे व महिला बचत गटातील सदस्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg