नवी दिल्ली: तामिळनाडूतील सर्व 234 विधानसभा जागांसाठी आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी संपणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, मतदानाच्या 48 तास आधी प्रचार थांबवला जाईल, त्यानंतर सर्व प्रकारच्या सार्वजनिक सभा आणि राजकीय प्रचारावर बंदी असेल. तामिळनाडूमध्ये 4,023 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील मुख्य लढत डीएमके आणि एआयएडीएमके आघाडी यांच्यात आहे. अभिनेते-राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्षामुळे अनेक लढतींना तिरंगी रुप आले आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, या निवडणुकीत 5.73 कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र आहेत. मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि 100 टक्के मतदान सुनिश्चित करण्यासाठी, निवडणूक आयोगाने राज्यभरात व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 16 जिल्ह्यांतील 152 जागांकरिता 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर बंगालमधील आठ, दक्षिण बंगालमधील तीन आणि जंगलमहल भागातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.
यामध्ये मुर्शिदाबादमधील 22, कूचबिहारमधील नऊ, जलपाईगुडीमधील सात, अलीपूरद्वारमधील पाच, कालिम्पोंगमधील एक, दार्जिलिंगमधील पाच, उत्तर दिनाजपूरमधील नऊ, दक्षिण दिनाजपूरमधील सहा, मालदामधील 12, बीरभूममधील 11, पश्चिम बर्धमानमधील नऊ, पूर्व मेदिनीपूरमधील 16, पश्चिम मेदिनीपूरमधील 15, झाडग्राममधील चार, पुरुलियामधील नऊ आणि बांकुरामधील 12 जागांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 1,478 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण मतदार संख्या 3 कोटी 60 लाख 77 हजार 171 असून, त्यात 1 करोड़ 84 लाख 99 हजार 496 पुरुष, 1 कोटी 75 लाख 77 हजार 210 महिला व 465 ट्रांसजेंडर मतदारांचा समावेश आहे.





























1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.