loader
Breaking News
Breaking News
Foto

विरोधकांच्या टीकेनंतर भाजपच्या स्वीकृत नगरसेवक तुषार आपटेंचा राजीनामा

ठाणे: बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि बदलापूर कुळगाव नगरपालिकेतील भाजपचे (BJP) स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या आदेशानंतर वरिष्ठांकडे त्यांनी आपला राजीनामा दिला.विशेष म्हणजे, कालच कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या कार्यकारणी बैठकीत आपटे यांना स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर, समाजातून तीव्र प्रतिक्रिया येत होत्या, तर भाजपने तुषार आपटे याच्या स्वीकृत नगरसेवकपदाचा तातडीने राजीनामा घेतला नाही तर येत्या 13 किंवा 14 जानेवारीला मनसे (MNS) बदलापूरमध्ये मोर्चा काढेल आणि आंदोलन करेल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला होता. वाढता विरोध लक्षात घेत तुषार आपटेंनी आपला राजीनामा दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात 'बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देऊन भाजपाने आपले प्राधान्य कशाला आहे हे स्पष्ट केले आहे. बालके आणि महिलांच्या सुरक्षेला कोणत्याही सरकारचे प्राधान्य असायला हवे. परंतु भाजपाने पोस्को कायद्याचा ठपका असलेल्या व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देऊन असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.' असं त्यांनी म्हटलं आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg