loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवा शहरातील प्रभाग क्रमांक 18(ड)मध्ये बळीराज सेनेची कडवी झुंज ! प्रचारात आघाडीवर

आबलोली (संदेश कदम) - ठाणे जिल्ह्यात आता महानगरपालिका निवडणुकीने अंतिम टप्प्यात प्रचाराचा वेग घेतला आहे.दिवा शहरातील प्रभाग क्रमांक 18 ( ड ) मध्ये बळीराज सेनेने प्रथमच येथील जेष्ठ सामाजिक व राजकीय अभ्यासक कार्यकर्ते प्रवीणदादा उतेकर यांना उमेदवारी देऊन मोठी राजकीय दहशत निर्माण केली आहे, त्यातच रविवारी दिनांक 11 रोजी बळीराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वालम व पक्षाचे इतर वरिष्ठ पदाधिकारी जाहीर मेळावा घेत असल्याने दिव्यातील बळीराज सेनेच्या सैनिकांमध्ये विजयाचा आत्मविश्वास वाढला आहे. राजकीय सर्व्हे नुसार या प्रभागातील लढाई ही बळीराज सेने सोबत होणार असल्याचे राजकीय वातावरण आहे. बळीरासेना प्रचारात आघाडीवर आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिवा शहरात राज्यातील विविध विभागातील जनता नोकरीं व्यवसाय यासाठी मोठया संख्येने वास्तव्य करीत असून, दिवा शहरातील मुख्य समस्या पिण्याचे पाणी - रस्ते, आरोग्य , घनकचरा , शिक्षण विभाग- विद्युत व्यवस्था , कायदा सुव्यवस्था - स्थानिक समस्या व पावसाळ्यात साचणारा चिखल यामुळे नागरिक त्रस्त आहेत ! जनतेला आता बदल हवा असून बळीराज सेना हा नवा पर्याय मतदार यांना मिळाला आहे . प्रवीणदादा उतेकर यांनी प्रथम पासूनच प्रचारात आघाडी घेतली असून ते विजयाचे नजदिक आहेत. पूर्वी ते शिवसेना उबाठाचे नेते म्हणून कामं करीत होते; मात्र त्यांनी बळीराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम यांचे कार्यावर प्रेरित होऊन बळीराज सेनेत प्रमुख कार्यकर्त्यासह जाहीर प्रवेश केला . त्यानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडल्या व त्यांना प्रभाग 18 ( ड ) मधून पक्षाने निवडणुकीत उतरविले आहे. दरम्यान आता दिवा शहरात बळीराज सेनेने विजयासाठी जंग-जंग पछाडले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg