loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड-निपाणी हायवेदरम्यान अपघात, चुकीच्या पद्धतीने खोदलेला चर कारणीभूत ठरला

कणकवली (प्रतिनिधी) - देवगड-निपाणी हायवेवरील फोंडाघाटमध्ये घाटरस्ता रुंदीकरणासाठी खोदण्यात आलेल्या चरात कार कोसळून अपघात घडला आहे. सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी सुखरूप असले तरी फोंडाघाटातून खोदलेल्या ह्या चरांमुळे भविष्यात आणखी अपघात होऊन जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांना वारंवार सूचना देऊनही अक्षम्य दुर्लक्षपणा केला जात असून याविरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फोंडाघाट मधील घाटरस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या रुंदीकरण कामासाठी काही ठिकाणी खोल चर खोदण्यात आले आहेत. चराभोवती केवळ सुरक्षेच्या पट्‌ट्या गुंडाळून ठेवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखेच आहे. हे चर खोदल्यानंतर ये-जा करणार्‍या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी रोड डायव्हर्शन, दिशादर्शक फलक अथवा चरामुळे अपघात घडू नये यासाठी बॅरिकेटिंग करणे अत्यावश्यक आहे, असे बोलले जात आहे. तरी सदर ठिकाणी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg