loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी तालुका पोलीस पाटील संघटना ग्रामीण विभागाच्या अध्यक्षपदी अमेय वेल्हाळ

रत्नागिरी : गाव कामगार पोलीस पाटील संघटना रत्नागिरी तालुका ग्रामीण विभागाच्या अध्यक्षपदी पाली गावचे पोलीस पाटील अमेय वेल्हाळ यांची निवड करण्यात आली आहे. या विभागाची सभा जेष्ठ नागरिक हॉल, कुवारबाव येथे जिल्हा अध्यक्ष व राज्य खजिनदार विश्वनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संघटनेची कार्यकारणी २०२१-२०२५ च्या कार्यकारिणीचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नवीन कार्यकारिणी तीन वर्षासाठी नेमण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अध्यक्षपदी अमेय वेल्हाळ, उपाध्यक्षपदी संतोष नागवेकर, सचिवपदी प्रिया बंदरकर, सहसचिवपदी आरती धनावडे, खजिनदारपदी संजू सावंत, सहखजिनदार प्रविण धुमक तर सदस्यपदी अंजली शितूत, संस्कृती सरफरे, समीक्षा शिंदे, नेहा देवरुखकर, प्रविण कांबळे, प्रेक्षा जाधव, संतोष भोजे, शर्वरी सनगरे, रश्मी साळवी, अस्मिता शिवलकर, संदेश नेवरेकर तर सल्लागारपदी नितीन कांबळे, जिल्हा प्रतिनिधी संतोष सकपाळ, सदस्य महिला प्रतिनिधी म्हणून शलाका सावंतदेसाई यांची निवड करण्यात आली आहे. या सभेला जिल्हा सचिव रविंद्र कोटकर उपस्थित होते. गाव कामगार पोलीस पाटील यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन यावेळी नुतन अध्यक्ष अमेय वेल्हाळ यांनी दिले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg