loader
Breaking News
Breaking News
Foto

गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - चिपळूण तालुक्यातील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूलच्या प्राथमिक विभागात संस्थेच्या गुरुदक्षिणा सभागृहात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव, टाळ्यांचा कडकडाट आणि आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी सभागृह विद्यार्थ्यांनी, पालकांनी व मान्यवरांनी गजबजून गेले होते. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस हवालदार किशोर साळवी (गुहागर पोलीस ठाणे) हे उपस्थित होते. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष शोभा आली. कार्यक्रमास प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. साक्षी गोरीवले, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पद्मजा येसादे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. प्रिया पोटसुरे, तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक प्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर शैक्षणिक, क्रीडा व विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके, पदके व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद व पालकांचा अभिमान या क्षणांना विशेष भावनिक बनवत होता.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg