loader
Breaking News
Breaking News
Foto

एल. टी. टी. मध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि नगरसेवक यांचा सत्कार सोहळा

खेड- येथील लायन्स एज्यू सोसायटी संचालित एल.टी.टी इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये नूतन नगराध्यक्षा आणि नगरसेवक यांचा सत्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष अहमदभाई मुकादम यांनी भूषविले. यावेळी परवेज मुकादम, माजिद खतीब, जयेश गुहागरकर, प्रेमळ चिखले, समन्वयक जॉय, मुख्याध्यापक सारंग, प्राथ विभागाच्या मुख्याध्यापिका कुडाळकर, सर्व नगरसेवक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रथम सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जॉय यांनी कार्य क्रमाचे प्रास्ताविक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेडच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला यांचा सत्कार अध्यक्ष अहमदभाई मुकादम यांच्या हस्ते करण्यात आला व यानंतर सर्व नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल आणि स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माधवीताई बुटाला, वैभवी खेडेकर, निकेतन पाटणे, आरिफ मुल्लाजी, सतिश चिकणे यांनी शाळेबद्दल गौरवोदगार काढून शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मुख्याध्यापक सारंग सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सारिका निवळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg