loader
Breaking News
Breaking News
Foto

निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात ईडीची धडक कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ

नागपूर. राज्यभरात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कोट्यवधी रुपयांच्या अवैध वाळू उत्खनन आणि तस्करी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांवर एकाचवेळी छापे टाकले. या अचानक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात तसेच प्रशासकीय यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ईडीने भंडाऱ्यातील दोन नामांकित वाळू व्यावसायिकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापेमारी करत तब्बल 12 तास कसून चौकशी केली. या कारवाईदरम्यान ईडीच्या हाती अनेक धक्कादायक पुरावे लागल्याची माहिती आहे. छाप्यातून महत्त्वाची कागदपत्रे, नोंदणी रजिस्टर, दोन मोबाईल फोन आणि तब्बल 4.50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. इतकंच नाही तर अवैध वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणारी दोन पोकलँड मशिन्स, दोन जेसीबी आणि एक फॉर्च्युनर गाडीही जप्त करत त्यांना सील ठोकण्यात आलं आहे. या यंत्रसामग्रीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतूक होत असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. भंडाऱ्यासोबतच नागपूरमध्येही ईडीच्या पथकांनी विविध ठिकाणी छापेमारी करत संबंधित व्यक्तींची चौकशी केली. वाळू तस्करीमधून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा तयार करून तो वेगवेगळ्या माध्यमातून फिरवला जात असल्याचा संशय असून, मनी लॉन्ड्रिंग अँगलनेही तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

टाइम्स स्पेशल

ईडीच्या या कारवाईमुळे केवळ स्थानिक वाळू व्यावसायिक नव्हे, तर त्यांच्या मागे उभं असलेलं संपूर्ण नेटवर्क,ट्रान्सपोर्टर्स, सरकारी यंत्रणांतील काही घटक आणि राजकीय आशीर्वाद यांचाही तपासाच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. जप्त केलेल्या मोबाईल्स आणि कागदपत्रांच्या तपासातून मोठी नावं समोर येऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg