loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी अखेर का सोडले ?

मुंबई : केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीकात्मक मांडणी केल्याच्या आरोपावरून लंडनस्थित डॉक्टर संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी मुंबई विमानतळावरून चौकशीसाठी रात्रो दोन वाजता ताब्यात घेतले . त्यांची चौकशी केली . मुंबईतील ना.म. जोशी पोलीस स्टेशनमध्ये त्यांची चौकशी सुरू होती . भाजपच्या एका कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीवरून डॉ. पाटील यांना ताब्यात घेण्यात आले ..

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संग्राम पाटील हे वैद्यकीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. सध्या ते ब्रिटनमध्ये वैद्यकीय सेवा बजावत आहेत. कोरोना काळात भारतात भीतीदायक वातावरण असताना त्यांच्या समाज माध्यमांवरून ते लोकांना धीर देत होते. तसेच भारत सरकारच्या अनेक योजना आणि निर्णयांवरही ते आपली मते मांडत असतात. यातूनच त्यांची प्रतिमा भारतसरकारविरोधी असल्याचा आरोप केला जातो.डॉ. संग्राम पाटील यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावरून भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याकरिता तसेच भाजप विचारधारेचे समर्थन करणारे आणि त्याचा विरोध करणारे समाजातील गटांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याच्या इराद्याने चुकीची आणि खोटी माहिती पसरवली, असा आरोप भाजप कार्यकर्ते निखिल भामरे यांनी केला आहे. हे आरोप पाटील समर्थकांनी फेटाळून लावले . ऐन निवडणुकीत गोंधळ नको म्हणून तूर्त प्रकरण स्थगित असल्याचे समजते.

टाइम्स स्पेशल

डॉक्टर संग्राम पाटील यांना 15 तासांनंतर सोडण्यात आले आहे आणि ते एरंडोल या जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या गावाकडे रवाना झालं आहेत.केवळ युके ( United Kingdom) चे नागरिकत्व असल्याने पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत. भारतातून जातांना पोलिसांना भेटून जावे असे बंधन त्यांच्यावर घालण्यात आलेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg