loader
Breaking News
Breaking News
Foto

‘स्वच्छ सावंतवाडी तरच येणार लक्ष्मी’; नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी मांडला विकासाचा रोडमॅप

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सुंदर आणि स्वच्छ सावंतवाडी करण्याच्या दृष्टीने आम्ही खंबीर पावले उचलली आहेत. सावंतवाडी स्वच्छ असेल तरच लक्ष्मी येणार, असा आमचा ठाम विश्वास आहे, असे प्रतिपादन सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, नगरसेवक आणि नागरिक यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नगराध्यक्षांची भेट घेऊन संवाद साधला असता त्या बोलत होत्या. यावेळी युवराज लखमराजे भोसले यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. सावंतवाडी शहराच्या स्वच्छतेवर सर्वाधिक भर दिला जात असल्याचे सांगत नगराध्यक्षा म्हणाल्या की, सर्व अधिकारी, नगरसेवक आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने शहर स्वच्छ ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेषतः विश्रामगृहासमोर भरणार्‍या आठवडा बाजारामुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यात यश आले आहे. आता हा बाजार अधिक सुटसुटीत झाला असून, त्या ठिकाणी लवकरच वॉटर फिल्टर आणि मोबाईल स्वच्छतागृहांची सोय केली जाणार आहे. तसेच आठवडा बाजाराची जागा इतर दिवशीही वापरासाठी उपलब्ध करून देण्याबाबत सर्वांचा विचार घेऊन निर्णय घेतला जाईल. शहरातील पार्किंग आणि ट्रॅफिकचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, पोलीस निरीक्षक, नगरसेवक आणि नगरपरिषद अधिकारी यांच्यासोबत प्राथमिक बैठका झाल्या आहेत. लवकरच नगरपालिकेच्या बैठकीत ठोस धोरण ठरवून दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था निश्चित केली जाईल.

टाईम्स स्पेशल

नगराध्यक्षांनी शहराला भेडसावणार्‍या विविध समस्यांवर उपाय शोधण्याचे आश्वासन दिले. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा निर्माण करणे. मच्छर, गटार साफसफाई आणि भटके कुत्रे व माकडांचा त्रास कमी करण्यासाठी कर्मचार्‍यांसोबत बैठकांचे सत्र सुरू आहे. जिमखाना मैदानाच्या देखभालीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. बंद असलेले पर्यटन स्वागत केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया आणि उपाययोजनांवर चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्या निमित्ताने मी शहराच्या कानाकोपर्‍यात फिरले आहे, त्यामुळे स्थानिक समस्यांची मला जाण आहे. शहरात पर्यटन वाढवून स्थानिकांना रोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन टप्प्याटप्प्याने विकासकामे मार्गी लावली जातील, असा विश्वास श्रद्धा सावंत-भोसले यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg