loader
Breaking News
Breaking News
Foto

रखडलेल्या न्यू मांडवे धरणाबाबत ११ जानेवारी रोजी मुंबईत भूमिपुत्रांची जाहीर सभा

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील अष्टक्रोशी विभागात महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन १९९३-९४ मध्ये न्यू मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्पाची सुरुवात झाली होती. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प अपूर्ण अवस्थेतच आहे. दरवर्षी निधी खर्च होऊनही काम पूर्ण होत नसल्याने स्थानिक भूमिपुत्र नितिन सखाराम जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित विभागाकडून अनेकदा आश्वासने देण्यात आली, तरीही प्रकल्पाचे काम पुढे सरकले नाही. नितिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्यावतीने २६ जानेवारी २०२२ रोजी प्रकल्पाच्या ठिकाणी एक दिवसाचे उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी प्रकल्पग्रस्त बांधवांचा मोठा पाठिंबा मिळाला. या उपोषणानंतर मुख्य अभियंता यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन द्वितीय सुधारित सुप्रमा तयार करण्याचे आदेश दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र त्यानंतर प्रत्यक्ष काम ठप्प झाले. सुधारित सुप्रमा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वित्त विभागापर्यंत पोहोचला असला तरी मंत्रिमंडळाच्या निर्णयाअभावी फाईल पुढे सरकली नाही. सात महिन्यांपासून मंत्रिमंडळाला वेळ न मिळाल्याने नितिन जाधव यांनी संबंधित विभागाला लेखी पत्राद्वारे आपला अंतिम निर्णय कळवला. त्यानंतर प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांसोबत सभा घेऊन भूमिका स्पष्ट करण्यात आली. ग्रामस्थांनी जाधव यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. या विषयावर मंत्री आमदार योगेश कदम यांच्यासोबत मंत्रालयात चर्चा झाली. तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून खेड तालुक्यात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले. तरीही शासन दरबारी केलेल्या पत्रव्यवहाराला आजपर्यंत कोणतेही उत्तर मिळालेले नाही. यामुळे भूमिपुत्र नाराज असून नितिन जाधव यांना न्याय मिळावा यासाठी मुंबईत भूमिपुत्रांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

ही सभा रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजता सदगुरु सिताराम बाबा शेडगे दरबार घाटकोपर, मुंबई या ठिकाणी होणार असून प्रकल्पग्रस्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, २६ जानेवारी २०२६ रोजी धरणाच्या भिंतीवर आत्मदहन करण्याचा निर्णय नितिन जाधव यांनी घेतला आहे. ग्रामस्थांनी त्यांना माघार घेण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले, मात्र जाधव आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे ही जाहीर सभा निर्णायक ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg