loader
Breaking News
Breaking News
Foto

फडणवीस-शिंदेंना खोट्या केसमध्ये अडकवण्याचे षड्यंत्र! माजी DGP सह 3 जणांवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस

ठाणे : ठाणे नगर पोलीस ठाण्यात 2016 मध्ये दाखल झालेल्या एका गंभीर गुन्ह्याच्या फेरतपासाचे आदेश देताना माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने गुन्हा नोंदवण्यासाठी जबरदस्त दबाव आणला जात असल्याचा धक्कादायक खुलासा विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत समोर आला आहे. या अहवालामुळे राज्याच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आपल्या निवृत्तीच्या अवघ्या पाच दिवस आधी हा अत्यंत महत्त्वाचा अहवाल अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे सादर केला होता. या अहवालात संजय पांडे यांच्यासह तत्कालीन उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहाय्यक आयुक्त सरदार पाटील यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची स्पष्ट शिफारस करण्यात आली आहे.अहवालानुसार, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मुंबईचे पोलीस आयुक्तपद आणि त्यानंतर महासंचालकपदाची सूत्रे संजय पांडे यांच्याकडे गेल्यानंतर या प्रयत्नांना अधिक वेग आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

ठाणे तसेच मुंबईतील सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये फडणवीस यांना गोवण्याकरता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आणण्यात आल्याचा उल्लेख विशेष तपास पथकाच्या अहवालात आहे.या अहवालानंतर संजय पांडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर प्रत्यक्ष गुन्हे दाखल होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg