loader
Breaking News
Breaking News
Foto

फिरती विज्ञान प्रयोगशाळा मार्फत संगमेश्वरातील विद्यार्थ्यांना बुरंबाड येथे विज्ञान प्रयोग दिग्दर्शनाचे आयोजन

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळामधून केंद्रस्तर ते तालुकास्तरीय चाळणी परीक्षेतून इस्रो व नासा अभ्यास दौरा आणि परीक्षेसाठी देशभरातून काही विद्यार्थ्यांची निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी शिक्षक व पालकांच्या विनंतीनुसार देवरुख व संगमेश्वर परिसरातील कांही विद्यार्थ्यांना प्रयोग प्रात्यक्षिकाची गरज ओळखून सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टच्यावतीने संगमेश्वर तालुक्यातील मार्गदर्शक व प्रशिक्षक दिलीप काजवे यांनी स्वतः आपल्या घरी एका दिवसाचे प्रयोग प्रात्यक्षिक, दिग्दर्शन कार्यशाळेचे मोफत आयोजन केले. सदर विद्यार्थ्यांना दिलीप काजवे प्रयोग दिग्दर्शन करीत असून सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टच्या वतीने संगमेश्वर तालुक्यातील २१ शाळाला दरमहा प्रत्यक्ष शाळेत जाऊन दिलीप काजवेकडून मार्गदर्शन कृती, प्रात्यक्षिक करण्यात येत असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यास नक्कीच मदत होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यशाळेसाठी देवरुख नं.४ शाळेतील विद्यार्थी स्वरूप पाटील, दूर्वा बांडागळे, अथर्व गुरव, कौशीक जाखी, डिंगणी खाडेवाडी शाळेतील विद्यार्थी सोहम पाकतेकर हे या वर्षीसाठी व पुढील वर्षाची तयारी सराव म्हणून बुरंबाड नं.२ शाळेतील विद्यार्थी प्रांजल मोरे, अनया काळंबी, वैष्णवी काळंबी, स्वरा रसाळ, अस्मी लिंगायत यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाचा लाभ घेतला असून याचा इस्रो व नासाच्या चाचणी परीक्षेसाठी नक्की उपयोग होणार आहे. यावेळी संबधीत शिक्षक रमेश मनवे, संजय तटकरे, सुरेश थरवळ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

या आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेबद्दल प्रकल्प अध्यक्ष रामचंद्र निकम, सदस्य सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विनायक पाध्ये, हरहुन्नरी सहप्रकल्प प्रमुख अजिंक्य पावसकर यांनी समाधान व्यक्त करीत जिल्हास्तर चाळणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी विद्यार्थ्यांचे शाळेतील मार्गदर्शक शिक्षक, प्रयोगशाळा मार्गदर्शक शिक्षक दिलीप काजवे, अरुण देसाई उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg