loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळुणात १२ जानेवारीपासून हभप आफळेबुवांची किर्तनमाला

खेर्डी, चिपळूण (संतोष पिलके) : श्री स्वामी चैतन्य परिवारातर्फे चिपळूणवासियांसाठी प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणारी किर्तनमाला यावर्षी १२ जानेवारीपासून सुरु होत आहे. यंदाच्या दशकपूर्ती किर्तनमालेत राष्ट्रीय किर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारूदत्तबुवा आफळे पेशवाईचा सुवर्णकाळ उलगडणार आहेत. दि. १२ ते १६ जानेवारी या कालावधीत शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात संपन्न होणारी ही किर्तनमाला दरवर्षी प्रमाणे रसिकांसाठी विनामूल्य आहे. गेली ९ वर्षे रसिकांचे भरभरून प्रेम लाभलेली यंदाची किर्तनमाला दर दिवशी सायंकाळी ६.३० ते रात्रौ ९.३० या कालावधीत संपन्न होणार आहे. किर्तनमालेचे उदघाटन सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता संत साहित्याचे गाढे अभ्यासक, प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आफळेबुवांच्या अमोघ वाणीला सुश्राव्य संगीत साथीदारांची नेटकी साथ असते. यावर्षी सहकारी कलावंत म्हणून तबला साथ मिलिंद तायवाडे, पखवाज साथ मनोज भांडवलकर व ऑर्गन साथ चिंतामणी निमकर करणार आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg