loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड मतदार संघाची पुनर्रचना लवकरच', शिवसेना नेते रामदास कदम यांच्या संकेताने खेड तालुक्यात आनंदाचे वातावरण

खेड (प्रतिनिधी) - '२००९ पासून विभागलेला खेड मतदारसंघ पुन्हा निर्माण होणार आहे', असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी जाहीरपणे सांगताच संपूर्ण खेड तालुक्यात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक वर्षांपासून पुनर्रचनेची मागणी करणाऱ्या नागरिकांसाठी हा आनंदाचा क्षण ठरला आहे. खेड येथील हॉटेल बिसु येथे झालेल्या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्यात रामदास कदम यांनी हा महत्त्वपूर्ण राजकीय संकेत दिला. या सोहळ्यात तालुक्यातील विविध गावांमधील इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिकाधिक भक्कम होताना दिसली. सभागृहात उपस्थित असलेल्या तालुकाप्रमुख अरुण चव्हाण, सचिन धाडवे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, विविध शाखांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी प्रवेशकर्त्यांचे उत्साहात स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नव्या सदस्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांचा विश्वास दृढ करण्यासोबतच विकासाचे ठोस आश्वासनही दिले. "तुम्ही दाखवलेला विश्वास केवळ शब्दांत मर्यादित राहणार नाही. खेड तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाचा वेग वाढवू, रोजगार, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण यासाठी सातत्याने प्रयत्न करणार," असे ते म्हणाले. माजी मंत्री कदम यांनी खेड नगर पालिकेतील ऐतिहासिक २१-० विजयाचा उल्लेख करत शिवसैनिकांचे मनोबल वाढवले. "खेडवासीयांनी यापूर्वीच दाखवून दिले की त्त्यांचा विश्वास शिवसेनेवर आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही भगवा एकहाती फडकवण्याची वेळ आली आहे," असे जोरदार आवाहन त्यांनी केले. या भाषणातील सर्वात ठळक आणि लक्षवेधी मुद्दा म्हणने खेड मतदारसंघाच्या पुनर्रचनेबाबत केलेला उल्लेख. कदम म्हणाले, २००९ पासून विभागलेला खेड मतदारसंघ पुन्हा तयार होणार आहे. आणि त्या मतदारसंघातून पुढील आमदार हा शिवसेना नेते रामदास कदम देत्तील तोच असेल, याची मला शंभर टक्के खात्री असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा आणि घोषणाबाजीचा गजर झाला. अनेक वर्षांपासून विभागलेला मतदार संघ पुन्हा होणार असल्याचे सांगतच सभागृहात नव चैतन्य संचारल्याचे दिसून आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी कदम यांनी गुहागर मतदारसंघाचा मुद्दाही अधोरेखित केला. दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश कदम यांनी गेल्या काही वर्षात साडेतीन हजार कोटींची विकास कामे केल्याचे सांगत असताना त्यांनी स्पष्ट केले की विकासापासून मागे राहिलेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ते स्वतः प्रयत्नशील राहणार आहेत. त्यामुळे आता दापोली पाठोपाठ गुहागर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले. कोकणातील तरुणांसाठी त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठी घोषणा केली. "कोकणातील अनेक युवक रोजगाराच्या शोधात बाहेर गेले आहेत. मला ते कोकणातच स्थिर व्हावेत असे वाटते. कोका-कोला कंपनीचे आणखी चार प्लांट कोकणात सुरू होणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल," असे त्यांनी स्पष्ट केले. शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाल्याने आणि कदम यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणांमुळे तालुक्यात उत्साहाची लहर पसरली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg