loader
Breaking News
Breaking News
Foto

दिव्यात प्रभाग २८ मधून शिंदे शिवसेनेचे पारडे जड, साक्षी मढवी कमी वयाच्या उमेदवार

दिवा :- ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरातील राजकीय वातावरणात प्रचाराचे ढग जमू लागले आहे. प्रभाग क्रमांक २८ मधील शिवसेनेचे शहरप्रमुख व माजी नगरसेवक रमाकांत मढवी, माजी नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे, माजी नगरसेवक दीपक जाधव व कु. साक्षी रमाकांत मढवी हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास प्रभागात शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मतदार वर्गात दिसून येत आहे. प्रचारा दरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना केलेल्या कामाची पोहचपावती असेल व दिवेकरांची देखील हीच भावना आहे हे मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिवा प्रभाग क्र २८ मधील यंदाच्या साक्षी मढवी या कमी वयाच्या उमेदवार असून त्यांनी अनेक शैक्षणिक व महिलांसाठी उपक्रम राबविले असून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन समाज व राजकारणात उडी घेतल्याने त्यांना त्यांच्या कामाची पोहचपावती मिळेल असे दिसून येत आहे. दिवा शहरातील अनेक विकास कामे व प्रश्न मार्गी लागले आहे. दिवेकर जनतेच्या अडीअडचणीला धावून जाणारे व सर्व सामान्यांसाठी सदैव तत्पर असलेले सर्व उमेदवार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. याच कामाची पावती म्हणून आज सर्वसामान्य नागरिक स्वतःहून त्यांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. दिव्यातील अनेक रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण केले असून दिवा शहर पाणीटंचाईतून मुक्त करण्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर केले आहे. दिवा शहरासाठी अनेक नवनवीन योजना प्रलंबित असून लवकरच त्या मार्गी लागतील असे उमेदवार रमाकांत मढवी यांनी २८ प्रभागात प्रचारादरम्यान सांगितले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg