loader
Breaking News
Breaking News
Foto

रोणापाल येथे काजू बागेला भीषण आग; शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान

बांदा (प्रतिनिधी) - रोणापाल-पुरण येथील काजू बागायतीला भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर काजू बागायतीत सुमारे सात वर्षांची कलमे असून यावर्षीपासून उत्पादन देणार होती. या आगीत दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीमध्ये अमित नकुळ गावडे, सहदेव जयराम गावडे आणि तानाजी महादेव गावडे यांच्या काजू बागायती जळून खाक झाल्या आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आग विझवण्यासाठी अग्निशामन बंबाला पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याआधीच स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. बाबल परब, प्रदीप नाईक, संदेश केणी, सुदिन गावडे, मंगेश गावडे, बाबल तुयेकर व अशोक कुबल यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून आगीचा फैलाव रोखला. यावेळी रोणापाल पोलीस पाटील निरजा परब यांनीही सहकार्य केले. आग लागून झालेल्या नुकसानीची माहिती कृषी व महसूल विभागाला देण्यात आली असून, नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून शेतकर्‍यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg