loader
Breaking News
Breaking News
Foto

माध्यमिक विदयालय धामापूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे पां. गो. महाडिक माध्यमिक विदयालय धामापूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम शाळा समिती चेअरमन संभाजी शेठ महाडिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. यावेळी शाळा समिती सदस्य सुरेश गायकर, शाळा व्यवस्था पण कमिटी उपाध्यक्ष दीपक चव्हाण, जि.प. माजी मुख्याध्यापक अजित कांबळे, धामापूर केंद्रशाळा नं.४चे माजी मुख्याध्यापक श्री.खातू, मुख्याध्यापक चंदनशिवे बी.एच. आदी मान्यवर उपस्थित होते. सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी स्वर्गीय गोविंरावजी निकम तसेच संस्था माजी अध्यक्षा स्वर्गीय श्रीमती अनुराधा ताई निकम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची सुरुवात गजानना, गजानना या गाण्याने झाली. सुरुवातीला दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर गवळण, नटरंग लावणी सर्वांना खूप आवडली. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर फुले सवित्री नसते तर.. विचार करायला भाग पाडले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर उत्तम नाटिका सादर केली गेली. छोट्या मुलींनी आईच्या आठवणी करिता नको जाऊ तू नको.. उत्तम सादर केले. त्याचप्रमाणे इतर गाणी, नाटीका सादर करण्यात आल्या. देशभक्तीपर गीत सादर करुन कार्यक्रमाची सांगता झाली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg