loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर कीर्तनवाडीत रंगला "कन्हैया प्ले स्कूल"चा बालमहोत्सव

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर शहरातील लहान मुलांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारे प्ले स्कूल म्हणुन कन्हैया प्ले स्कूलची ओळख असून माजी आमदार लोकनेते कै.रामभाऊ बेंडल, नातू, केसरकर, माजी सभापती आरेकर, सामाजिक कार्यकर्ते भागडे यांच्या स्मृतींना आदरांजली देत कार्यक्रमाला सुरुवात झाली. लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संचलित कन्हैया प्ले स्कूल, कीर्तनवाडी गुहागर आयोजित बालमहोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बालगोपालांनी विविध गाण्यांवर नृत्य करून धमाल केली, जादूगार प्रयोगाचा देखील चिमुकल्यांनी आनंद लुटला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बालमहोत्सवाचे उद्घाटन गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते झाले. गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले, यावेळी गुहागर नगरपंचायत मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी प्ले स्कूलने लहान मुलांना उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक सुविधा याबद्दल प्ले स्कूल च्या उपक्रमांचे कौतुक केले, तसेच या कार्यक्रमात संस्थेचे कार्याध्यक्ष साहिल आरेकर नगरसेवक राजेंद्र भागडे, कन्हैया प्ले स्कूल कमीटी अध्यक्ष नगर पंचायतीचे माजी शिक्षण सभापती सुजाता बागकर, संस्थेच्या महिला अध्यक्षा स्वाती कचरेकर, नगरसेवक सौरभ भागडे, कन्हैया प्ले स्कूल प्राचार्य राऊत, संचालक सिद्धेश आरेकर, माजी बांधकाम सभापती माधव साटले, उपसरपंच संतोष जोशी, अनंत ताणकर, अन्वीता मांडवकर, गोवलकर, सुर्वे, शिंदे तसेच बालगोपाळ विद्यार्थी, संस्थेचे कर्मचारी वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg