loader
Breaking News
Breaking News
Foto

सुकीवली येथे बौद्ध धम्माचा मंगलमय जागर

खेड (वार्ताहर) : - तालुक्यातील सुकीवली बौद्धवाडी येथे बौद्ध धम्म प्रसार व प्रचाराच्या निमित्ताने एक ऐतिहासिक व प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला. लुम्बीनी बौद्ध विहार परिसरात “बुद्धं सरणं गच्छामि” च्या निनादाने संपूर्ण वातावरण धम्ममय झाले. स्फूर्ती भूमी आंबडवे ते दीक्षा भूमी नागपूर या बौद्ध धम्म रथाचे आगमन होताच सुकीवलीवासीयांनी उस्फुर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाला अभूतपूर्व स्वरूप दिले. आम्रपाली महिला मंडळाकडून भन्ते यांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी भन्ते सुमेध बोधी यांनी दिलेल्या धम्मदेसनामध्ये आमचे मुक्ती दाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांमधून उपासक-उपासिकांना धम्म दीक्षा देण्यात आली. त्याचबरोबर पंचशीलाचे महत्व, त्याचा अर्थ व आचरण यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. धम्म दीक्षेसोबत दिलेल्या शीलांचे निष्ठेने पालन करावे, बौद्ध धम्म जीवनात उतरवून समाज परिवर्तनाचे कार्य पुढे न्यावे, असे प्रेरणादायी आवाहन भन्ते सुमेध बोधी यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेने बौद्ध धम्म प्रसार व प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला. या यशस्वी कार्यक्रमासाठी सुकीवली शाखा क्र. २५ व आम्रपाली महिला मंडळाने केलेली मेहनत विशेष उल्लेखनीय ठरली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg