loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यात थंडीचा पहिला बळी..! निफाडमध्ये 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

नाशिक. : राज्यात थंडीची लाट आली असून अतिथंडीने एकाचा बळी गेला आहे. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवगाव येथे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ समीर दौलत सोनवणे (वय 22) हा तरुण मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.घटनास्थळी दाखल झालेल्या लासलगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार, अति थंडीमुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने समीर सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समीर सोनवणे हा अवघ्या 22 वर्षांचा तरुण असून, त्याचा अचानक मृत्यू झाल्याची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तरुण वयात अशा प्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण देवगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. कोणतीही संशयास्पद बाब आढळून आलेली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमानात मोठी घट होत असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे वापरणे, उघड्यावर झोपणे टाळणे, लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोणालाही अचानक त्रास जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg