loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प. भडगांव उसरेवाडी शाळेत बालआनंद व पालक मेळावा उत्साहात

संगलट (खेड)( इक्बाल जमादार) - खेड शहराजवळील पी.एम. श्री. जिल्हा परिषद शाळाभडगाव उसरेवाडी येथे बालआनंद व पालक मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे आयोजन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. साक्षी सकपाळ, उपाध्यक्षा सौ. आर्या उसरे उपस्थित होत्या. तसेच सरपंच दिपक पदुमले, गावच्या तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष व दिवाकर प्रभु , शिक्षणतज्ज्ञ विजय दवंडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल नक्षे, ग्रा.पं. सदस्या श्रीमती सुवर्णा उसरे , माजी ग्रा.पं. सदस्य व सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर काटकर , ग्रामसेविका सौ. मीनाक्षी वाजे - सावंत यांच्यासह मुख्याध्यापिका श्रीमती श्रदधा खेडेकर, सहकारी शिक्षक सागर दौंड , सहकारी शिक्षिका श्रीम. सुरेखा भागवत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता श्री. बनसोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वस्तूंचे आकर्षक स्टॉल्स उभारले होते. तसेच फनी गेम्स, खेळ व उपक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पालकांनीही या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि आत्मविश्वासाचे अभिनंदन केले. बालआनंद व पालक मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, सहकार्य आणि आनंदी शिक्षणाची भावना निर्माण झाली असून शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध झाले असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg