loader
Breaking News
Breaking News
Foto

भालचंद्र महाराज जन्मोत्सवानिमित्त घर सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी)- प. पू. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या १२२ व्या जन्मोत्सव निमित्ताने नमो भालचंद्र ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या घर सजावट (दीपोत्सव) स्पर्धेला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विनोद महाडिक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कुशाग्र म्हाडगुत यांनी द्वितीय, तर भौमिक अंधारी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तसेच डॉ. विठ्ठल गाड यांनी चौथा, तर दुर्वेश सापळे व यज्ञेश डेगवेकर यांनी संयुक्तपणे पाचवा क्रमांक पटकाविला. उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये प्रथम – वैशाली काणेकर, पायल डिचोलकर, द्वितीय – स्वस्तिक कोदे, तर तृतीय – स्वानंद पारकर यांनी मिळवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भालचंद्र महाराज जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्पर्धेतील सर्व विजेत्यांना भालचंद्र महाराज संस्थानचे सभासद उमेश वाळके, काशीविश्वेश्वर देवस्थानचे सभासद शशिकांत कसालकर, चेतन अंधारी, संतोष पुजारे, सर्वेश शिरसाट, पारकर गुरुजी, पिंट्या महाडिक, विशाल नेरकर, विकास वरवडेकर पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी मान्यवर, भक्तगण तसेच नमो भालचंद्र ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण हनुमंत तांबट व प्रथमेश गावकर यांनी केले.

टाइम्स स्पेशल

विशेष म्हणजे, ही दीपोत्सव घर सजावट स्पर्धा सलग सातव्या वर्षी आयोजित करण्यात आली असून, सातत्याने राबवली जाणारी ही उपक्रमशील स्पर्धा शहरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या स्पर्धेमागील मुख्य उद्देश म्हणजे जन्मोत्सवाच्या निमित्ताने शहरात भक्तिमय वातावरणासहित स्वच्छता, समाज प्रबोधन तसेच येथील कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करणे, असा असल्याचे नमो भालचंद्र ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg