loader
Breaking News
Breaking News
Foto

मकरसंक्रांत निमित्त बाजारपेठांमध्ये ग्रामीण कारागीरांच्या ‘सुगड’ व ‘पणत्यां’ना नागरिकांचा प्रतिसाद

रत्नागिरी (डिजीटल डेस्क) - अवघ्या तीन दिवसांवर मकरसंक्रांती सण आला आहे. मकरसंक्रांती ‘सुगड’ हे सणाचे एक खास आणि सुंदर रुप आहे. सध्या रत्नागिरीच्या बाजारपेठांमध्ये ग्रामीण भागातील कारागीरांनी तयार केलेल्या मातीच्या सुगड आणि पणत्या घेवून विक्री करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रत्नागिरी शहरात सुगड विक्रीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ग्रामीण कारागीरांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे व त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी, यासाठी नागरिक आवर्जुुन ग्रामीण भागातील महिलांकडून सुगड व पणत्या खरेदी करताना दिसत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नवीन आशा, आरोग्य आणि समृद्धी ही मकरसंक्रांतीची प्रतिके म्हटली जातात. सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्याने निसर्गात मोठे बदल होत असतात. नवीन पिकांचा उत्सव सुरु होत असतो. त्यामुळेच ग्रामीण जनतेत मकरसंक्रांत उत्सवाची चाहूल असते. मकरसंक्रांतीपासून होळी सणापर्यंत ग्रामीण जनतेला आनंदाची पर्वणीच असते. तीळगूळ वाटणे, पतंग उडवणे, सुगड पूजा करुन त्याचे वाण देण्याची प्रथा आहे. नवीन वाण म्हणजे ग्रामीण भागात बांगड्या असे म्हटले जाते. विशेषतः नववधू काळे वस्त्र परिधान करुन किंवा एखादे कापड जवळ बाळगून यादिवशी सुगडीची पूजा करतात.

टाइम्स स्पेशल

यामागे नवीन आशा व आनंद सामावलेला असतो. मकरसंक्रांतीनिमित्त सध्या बाजारपेठांमधून खरेदीची गर्दी सुरु झाली आहे आणि महिलावर्गातही चैतन्याचे वातावरण आहे. ग्रामीण कारागीरांकडून सुगड व पणत्या खरेदी केल्या जात असल्याने विक्रेत्यांच्याही आनंदात भर पडत आहे. यामागे कारागीरालाही आर्थिक बळ देण्याचा उद्देश असल्याने तो सफल होताना दिसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg