loader
Breaking News
Breaking News
Foto

भेडशी न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी स्नेह मेळावा पारगड किल्ला येथे संपन्न

दोडामार्ग (प्रतिनिधी) - न्यू इंग्लिश स्कूल भेडशी हायस्कूल मध्ये आपले शिक्षण पूर्ण करून नंतर पुढील शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात काम करणारे तसेच काही सरकारी सेवेतून निवृत्त झालेले सन १९७८/८१ बॅच मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा यावर्षी सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्हा सीमेवर वसलेल्या शिवकालीन पारगड किल्ला येथे साजरा केला. यावेळी शाळेतील आठवणी एकमेकांना शेअर केल्या जुन्या आठवणीना उजाळा दिला चाळीस माजी विद्यार्थी एकञ आले. या विद्यार्थी यांना घडवणार्‍या शिक्षक गुरुवर्य यांचे आभार मानले. भेडशी न्यू इंग्लिश स्कूल मधिल हे विद्यार्थी गेल्या पाच वर्षापासून एकञ येऊन गेट टुगेदर साजरे करतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अगोदर देवगड, कुणकेश्वर, गोवा राज्य, कोल्हापूर अंबाबाई, जोतिबा दर्शन, टूर काढून स्नेह मेळावा साजरा केला. आणि या नवीन वर्षात त्यांनी पारगड किल्ला येथे भेट देऊन त्या ठिकाणी मुक्काम करून स्नेह मेळावा साजरा केला सकाळी किल्ला पाहणी करून कोदाळी येथील जागृत देवस्थान श्री देवी माऊली दर्शन घेतले. चाळीस माजी विद्यार्थी माजी सभापती दिपीका ज्ञानेश्वर मयेकर यांना आपल्या भगिनी मानतात. त्यांच्या घरी हे गोळा झाले होते. यामध्ये साटेली भेडशी, घोटगे, परमे, आवाडा, वायंगणतड, बोडदे, खानयाळे, कोनाळ, शिरंगे, झरेबांबर, इतर गावातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्व माजी विद्यार्थ्यांना घडवणारे गुरुवर्य शिक्षक, नागेश बंडाचे, मोरबाळे, गोवेकर, देसाई, गोलम, मुख्या. साळगावकर, कशाळीकर, सुरेश मणेरीकर, यांचे आभार मानले. त्यांच्या घडवणुकीमुळे काही जण सरकारी, नोकरी, सैन्य दल इतर क्षेत्रात काम करू शकले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg