loader
Breaking News
Breaking News
Foto

माजगाव केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात, नऊ जि. प. शाळांचा सहभाग

माजगाव केंद्राचे केंद्रप्रमुख जे.पी. परदेशी यांच्या संकल्पनेतून रसायनी पाताळगंगा परिसरातील माजगाव केंद्रात क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन राजिप शाळा तळवली येथे होते. शाळेचे मुख्याध्यापक मस्तान बोरगे, सहशिक्षक सुरेश मांडे आणि शाळा व्यवस्थापन समिती तळवली यांनी केले. कार्यक्रमाचे उदघाटन खालापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी दीपा परब यांचा हस्ते झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रमुख पाहुणे शिल्पा दास (वरिष्ठ विस्तार अधिकारी) आणि रविंद्र रघुवंशी (युनिट हेड बिर्ला कार्बन) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख जे. पी. परदेशी यांनी केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मस्तान बोरगे यांनी केले. या केंद्रस्तरीय स्पर्धेत ९ शाळांनी सहभाग घेतला होता.

टाईम्स स्पेशल

या क्रीडा स्पर्धेत लहान गट व मोठा गट असून त्यात सांघिक खेळ कबड्डी, लंगडी, आणि वैयक्तिक खेळामध्ये धावणे, लिंबू चमचा, पोते उड्या, दोरीवरच्या उड्या, बेडूक उड्या इत्यादी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सामन्यानंतर सर्व विजेत्या मुलांना बक्षीस देऊन आभार मानून कार्यक्रमाची सांगत करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg