loader
Breaking News
Breaking News
Foto

पंचनदी धरणाला सीसीटीव्ही कॅमेरे

बोरीवली (सागर गोवळे) - रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धरणांपैकी दापोली तालुक्यातील पंचनदी धरण आता सीसीटीव्ही कॅमेरात कैद रहाणार आहे. गेल्या काही दिवसांत या धरणावर कॅमेरा बसवण्याचे कामं चालू होतं, आता ते जवळ पास पूर्ण होत आले असून येत्या काही दिवसात कॅमेरे चालू होण्याची माहिती आहे. त्यामुळे पूर, भूस्खलन किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धरणाच्या परिसरातील परिस्थितीवर रिअल-टाइममध्ये लक्ष ठेवले जाणार आहे. ज्यामुळे त्वरित उपाययोजना करता येणार असून धरणातून पाणी सोडणे आदी कामांवर नजर ठेवता येणार आहे. अनेक धरणांवर पर्यटक येत असल्याने पर्यटकांच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी याचा वापर होईल. धरणांवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे मुख्य कारण म्हणजे Security & Monitoring, ज्यात चोरी-तोडफोड रोखणे, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे आणि धरणाच्या संरचनेवर लक्ष ठेवणे यांचा समावेश असतो, ज्यामुळे धरणाची सुरक्षा, पाणीपुरवठा यावर २४ तास लक्ष रहाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg