loader
Breaking News
Breaking News
Foto

अवधूत गुप्ते यांच्या गीताने तरुणाई थिरकली

चिपळूण (इकलाक खान)- वाशिष्ठी डेअरी आयोजित कृषी महोत्सव दिवसेंदिवस बहरला. कृषी महोत्सवातील स्टॉल्स, पशुधन पाहण्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीचा चिपळूणवासीयांनी मनमुराद आनंद लुटला. ’ ‘मावळा- स्वराज्याचे शिलेदार’ हा कार्यक्रम म्हणजे इतिहास शौर्य आणि स्वाभिमानाचा जिवंत जागर ठरला. तर मँगोज इव्हेंट्स आयोजित अवधूत गुप्ते यांच्या संगीताच्या कार्यक्रमाने तरुणाईला डुलायला, थिरकायला लावले. अवधूत गुप्ते यांच्यासह ईशानी पाटणकर, विकास धुरी, गोतडे यांच्या गाण्यांवर टाळ्यांचा कडकडाट शिट्‌ट्यांच्या आवाजाने वाशिष्ठी कृषी महोत्सव दणाणून गेले. ‘वन्स मोअर’ ने तर कल्लाच केला. तर शुक्रवारी अशोक हांडे प्रस्तुत ’मै आवारा हूँ’ या सांस्कृतिक कार्यक्रमात देखील धमालच उडवून दिली. गेले चार दिवस रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी चिपळूणवासीयांचे मनोरंजन केलेच शिवाय या कार्यक्रमांना देखील कला रसिकांनी तितक्याच ताकदीने दाद दिली. तर दररोज धार्मिक कार्यक्रम देखील झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुरुवार दिनांक ८ रोजी अवधूत गुप्ते- लाईव्ह परफॉर्मन्स या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. गायक विकास धुरी यांनी गणरायांच्या गीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. नंतर यांनी एकापेक्षा एक गीते सादर करून कार्यक्रमांमध्ये रंगत आणली चिपळूणमधील कला रसिकांची दाद मिळवली. मेरी मधुबाला, जेवला का पाहुण, सखे ग साजणी, माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर, भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर, काय सांगू हिला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, कांदे पोहे, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं अशी अनेक गाणी अवधूत गुप्ते गात असताना चिपळूणवासियांनी टाळ्यांचा शिट्यांचा कडकडाट केला. तरुणाईची हळूहळू पावले थिरकली आणि या तरुणाईने रंगमंचासह -समोर धमालच उडवून दिली यामध्ये बालकांचा देखील समावेश होता. एकंदरीत वाशिष्ठी कृषी महोत्सवाच्या रंगमंचावर प्रसिद्ध मराठमोळा गायक अवधूत गुप्ते यांच्या गीतांचा लाईव्ह शो मोठ्या उत्साहात आणि अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न झाला. शेती, माती, नाती, संघर्ष आणि स्वप्नं या सगळ्यांना शब्द-सुरांची साथ देणार्‍या त्यांच्या गीतांनी उपस्थितांच्या मनाला थेट हात घातला. गाण्यांच्या प्रत्येक ओळीतून महाराष्ट्राची ओळख, ग्रामीण संस्कृतीचा आत्मा आणि मराठी माणसाची भावना आधोरेखित होत होती. त्यामुळे या कार्यक्रमाने तरुण पिढीला केवळ मनोरंजन नाही, तर मराठी गीतपरंपरेची ओळख आणि मूल्यांची जाणीव करून दिली.

टाइम्स स्पेशल

याप्रसंगी लाईव्ह बँड, प्रकाशयोजना, रंगमंचावरील ऊर्जा आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला. गाण्यांमधील संवाद, मिश्किल किस्से आणि भावनिक क्षणांनी प्रेक्षकांना हसवले आणि अंतर्मुख सुद्धा केले. त्यामुळे शेती, पशुधन आणि विकासाच्या चर्चांमध्ये रमलेल्या महोत्सवाला या सांस्कृतिक कार्यक्रमाने एक वेगळी उंची दिली आणि कोकणवासीयांच्या मनात दीर्घकाळ टिकणारी आठवण निर्माण केली. ’जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. हा कार्यक्रम इतका बहरदार झाला की चिपळूणमधील कलारसिकांनी शेवटच्या गाण्यापर्यंत आपली खुर्ची सोडली नव्हती. या कार्यक्रमादरम्यान वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी नामवंत गायक अवधूत गुप्ते यांच्यासह अन्य गायकांचा सन्मान केला. तर कृषी महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमांना चिपळूणवासीयांनी दिलेल्या प्रतिसाद बद्दल प्रशांत यादव यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg