loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी थोरलेभरड, सज्जनवाडी येथील रस्त्यांच्या कामांना मुहूर्त; गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते भूमिपूजन

साटेली भेडशी (प्रतिनिधी) - साटेली थोरलेभरड सज्जनवाडी येथील अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्याहस्ते नुकतेच येथील दोन नवीन रस्त्यांच्या कामाचे अधिकृत भूमिपूजन करण्यात आले. सदर रस्ते आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून साकारले जाणार आहेत. यावेळी बोलताना गणेशप्रसाद गवस म्हणाले की, "पावसाळ्यातील बिकट परिस्थिती आणि दैनंदिन वाहतुकीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी या रस्त्यांची अत्यंत गरज होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन तातडीने पाठपुरावा करण्यात आला आणि आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे. दर्जेदार कामासह हे रस्ते लवकरच पूर्ण होतील." या कार्यक्रमाला स्थानिक नेत्यांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली. यामध्ये संजय गवस, भगवान गवस, रामदास मेस्त्री, संतोष शेटये, लाडू आयनोडकर आणि उपसरपंच डिंगणेकर यांचा समावेश होता. रस्ते पूर्ण झाल्यानंतर साटेली-भेडशी परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg