loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली शाळा नं.१ इमारतीच्या गळक्या स्लॅबवर पत्राशेडची मागणी करूनही अद्याप कार्यवाही नाही

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली शाळा नं.१ इमारतीच्या गळक्या स्लॅबवर पत्राशेड मिळावी ही मागणी गेली दोन वर्षे ग्रामस्थ करीत असूनही अद्यापही यावर कार्यवाही होताना दिसत नाही. पावसाळ्यापूर्वी पत्राशेड न झाल्यास लोकसहभागातून लाखो रुपयांची घेतलेली साधने, विद्यार्थ्यांसाठी केलेल्या सोयी सुविधा, शाळेची रंग रंगोटी व अंतर्गत सजावट याचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. शाळा इमारतीच्या गळक्या स्लॅबवर पत्राशेड टाकण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदने देऊनही अद्याप ही यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः शाळेची पाहणी केली तेव्हा ग्रामस्थांनी गळक्या स्लॅबवर त्वरित पत्रा शेड टाकण्याची मागणी केली होती. तेव्हा त्यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन त्वरित कार्यवाही केली जाईल असे आश्‍वासन दिले होते. सदर आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वरवेली नं.१ शाळेच्या मुख्य इमारतीमध्ये चार वर्ग खोल्यांमध्ये पावसामुळे पाणी झिरपून गळती होत असते. विद्यार्थ्यांना वर्गात बसविणे कठीण होत असते. तसेच झिरपणार्‍या पाण्यामुळे वर्गातील साहित्याचे खूप नुकसान झाले आहे. या शाळेचा शतक महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. या शतक महोत्सवाच्या अनुषंगाने सदर इमारतीसाठी पत्राशेड उपलब्ध होईल अशी नागरिकांची आशा होती परंतु ती होऊ शकली नाही हे खर्‍या अर्थाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे दुर्दैव आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे म्हटले जाते. तरी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांनी याबाबत योग्य ते निर्णय घेऊन ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंतीही नागरिकांमधून होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg