loader
Breaking News
Breaking News
Foto

दुरुस्ती आधी, हस्तांतरण नंतर! न्हावेली माऊली मंदिर रस्त्यासाठी उपसरपंच अक्षय पार्सेकरांची ठाम भूमिका

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेला न्हावेली मुख्य रस्ता ते माऊली मंदिर जोड रस्ता सध्या खड्डेमय व अर्धवट अवस्थेत असून ग्रामस्थांचा संयम सुटत चालला आहे. या रस्त्याची देखभाल-दुरुस्तीची मुदत संपण्यापूर्वी सर्व त्रुटी दूर करूनच रस्ता जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करावा, अशी ठाम मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा न्हावेलीचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संदर्भात त्यांनी कार्यकारी अभियंता चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे, अपूर्ण गटारे आणि दुर्लक्षित कामे असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ३१ मे २०२६ पर्यंत असलेल्या देखभाल कालावधीत कंत्राटदाराने सर्व कामे पूर्ण करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

रस्ता खराब अवस्थेतच जिल्हा परिषदेकडे वर्ग झाल्यास भविष्यात दुरुस्तीचा भार ग्रामपंचायतीवर पडेल, अशी भीती व्यक्त करत दुरुस्तीशिवाय हस्तांतरणाला विरोध दर्शविण्यात आला. यावर कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, सर्व अपूर्ण कामे पूर्ण करूनच रस्ता हस्तांतरित केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्यासह प्रशांत साटेलकर, ओम पार्सेकर, राज धवण, अमोल पार्सेकर, अनिकेत धवण, भावेश पार्सेकर तसेच न्हावेलीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg