loader
Breaking News
Breaking News
Foto

शासकीय रेखाकला परीक्षेत मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कुलचे घवघवीत यश

मालवण (प्रतिनिधी) - सन २०२५- २६ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल या प्रशालेने घवघवीत यश संपादन केले. या प्रशालेचा एलिमेंटरी परीक्षेचा निकाल १०० टक्के तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९३.२० टक्के लागला. या परीक्षेत प्रशालेच्या तीन विद्यार्थ्यांनी अ श्रेणी तर १२ विद्यार्थ्यांनी ब श्रेणी प्राप्त केली आहे. एलिमेंटरी परीक्षेसाठी भंडारी हायस्कुलचे एकूण २२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यामध्ये उर्विका गुरुदास मालंडकर हिने अ श्रेणी प्राप्त केली. तर दीक्षा सुजित खवणेकर, लतीकेश गजानन तरवडकर, निर्मिती अनिल सरमळकर, निर्मिती निळकंठ घाडी, पार्थ उमेश सामंत, सानवी नरेंद्र हिंदळेकर या सहा विद्यार्थ्यांनी ब श्रेणी प्राप्त केली तर उर्वरित १५ विद्यार्थ्यांनी क श्रेणी मिळवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच इंटरमिजिएट परीक्षेसाठी एकूण १५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामधील १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथमेश प्रमोद चव्हाण व वेदांत श्रीकांत वायंगणकर या दोन विद्यार्थ्यांनी अ श्रेणी प्राप्त केली. तर धीरज रुपेश जुवाटकर, मिथिल राजू मालवणकर, नक्षत्रा परेश जावकर, स्नेहा शिवराम मसुरकर, उदित धोंडी वाडेकर, यशस्वी सचिन कातवणकर या सहा विद्यार्थ्यांनी ब श्रेणी प्राप्त केली. तसेच ईशा मयूर कांबळी, मयुरेश सदाशिव पालव, मुग्धा महेश सुर्वे, रिया आनंद भोगले, श्वेता रमेश पाटकर, वेदांत विष्णू बिरमोळे या विद्यार्थ्यांनी क श्रेणी मिळवली.

टाइम्स स्पेशल

या सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक मोरेश्वर गोसावी, आचरेकर, सेवानिवृत्त कलाशिक्षक अरविंद जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भंडारी एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर व अन्य पदाधिकारी, मुख्याध्यापक हणमंत तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg