loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सची भारतीय सैन्य दलामध्ये 'अग्नीवीर' साठी निवड

सावंतवाडी (प्रतिनिधी) - श्री पंचम खेमराज महाविद्यालयामधील एनसीसी आर्मी कॅडेट्स आर्य दिनेश गावडे व प्रणव भालेकर यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली. त्याचबरोबर महाविद्यालयातील अविष्कार शरद डीचोलकर व गणेश अरुण गावडे याचीसुद्धा भारतीय सैन्यदलामध्ये 'अग्नीवीर' साठी निवड झाली. यानिमित्ताने आर्य दिनेश गावडे व अविष्कार शरद डीचोलकर यांचा सत्कार नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे हे यश लाभले. संस्थेचे अध्यक्ष खेमसावंत भोंसले, सौ. शुभदादेवी भोंसले, युवराज्ञी उर्वशीराजे भोंसले, संचालक प्रा.डी. टी.देसाई यांनी अभिनंदन केले आहे. ते प्रशिक्षणासाठी त्यांना दिलेल्या प्रशिक्षण स्थळी रवाना होत आहेत. याप्रसंगी संस्थेचे संचालक ॲड. शामराव सावंत, डॉ.सतीश सावंत व जयप्रकाश सावंत, त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल.भारमल, एनसीसी आर्मी विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ. सचिन देशमुख, महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी , एनसीसी कॅडेट्स, व सर्व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg