loader
Breaking News
Breaking News
Foto

शरीरसौष्ठव ही ईश्वराची देणगी, तिची जपणूक हा युवाधर्म - भाजपा युवा नेते विशाल परब

सावंतवाडी : शिरोडा येथील फोर्ज क्लासिक २०२६ बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनचे दिमाखदार उदघाटन करत आयोजकांचेही भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी कौतुक केले. आजच्या धकाधकीच्या युगात शरीरसौष्ठव राखणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. परमेश्वराने दिलेल्या या देणगीची जपणूक युवकांनी करायलाच हवी. मात्र यासाठी मेहनत घेणाऱ्या युवकांचे कौतुक करणारी शिरोड्या सारख्या ग्रामीण भागात भरलेली ही भव्यदिव्य बॉडीबिल्डिंग कॉम्पिटिशन तेवढीच महत्त्वाची आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या सर्व मंडळींचे मी मनापासून कौतुक करतो असे गौरवोद्गार या स्पर्धेचे उद्घाटक भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी काढले. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने शिरोडा येथे आयोजित करण्यात आलेल्या फोर्ज क्लासिक २०२६ बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी विशाल परब यांच्या समवेत मनोज उगवेकर माजी सरपंच शिरोडा, हितेन नाईक सावंतवाडी युवा मोर्चा अध्यक्ष, राहुल राऊळ व फोर्ज क्लासिक मित्रमंडळ परिवार सदस्य, राजन राऊळ व मित्र परिवार, शिवाजी जाधव, प्रितेश नाईक, अभिषेक सावंत, उद्धव चिपकर आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg