loader
Breaking News
Breaking News
Foto

समाजासाठी झटणारा देवमाणूस भरत नाटेकर यांचा गौरव प्रेरणादायी; नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - श्रीदेव महापुरुष भजन मंडळ पूर्णगड रत्नागिरी व मैत्री ग्रुप गावडे आबेरे यांच्या सयुक्त विद्यमाने शासकिय सेवा निवृत्तीपश्चात आणि कार्यप्रेरणा कृतज्ञता सन्मान सोहळा सत्कारमूर्ती भरत बाळकृष्ण नाटेकर यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा कार्यक्रम सपत्निक सत्कार नुकताच खा़रवी समाज भवन रत्नागिरी येथे संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी शहराच्या प्रथम नागरिक शिल्पाताई सुर्वे याच्या अध्यक्षतेखाली राजेद्र यादव पोलिस निरीक्षक ग्रामिण पोलीस स्टेशन रत्नागिरी, उदय बने, समाजसेवक रंगकर्मी श्रीराम सारंग, खारवी समाज पतसंस्था उपाध्यक्ष सुधीर वासावे, मैत्री ग्रुपचे अध्यक्ष गोपाळ हरचकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमला सुरुवात करण्यात आली व सर्व मान्यवराचे स्वागतही करण्यात आले. श्री देव महापुरुष भजन मंडळ पूर्णगड रत्नागिरी व मैत्री ग्रुप यांच्या सयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवून निवृत कर्मचारी वर्गाला एक प्रकारची प्रेरणाच मिळते. या सस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात आणि आजही त्याची प्रचिती आपणाला येत आहे, असे वक्तव्य प्रास्ताविक करताना मदन डोर्लेकर गुरूजी यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रवासधारा मुबई या मंडळामार्फत समाज परिवर्तनची खरी सुरूवात भरत भाऊनी केली आणि मागे वळून कधी पाहिलेच नाही. आणि मैत्री ग्रुपचीही स्थापना करून आम्हाला प्रेरणा दिली असे उद्गगार मैत्री ग्रुपच्यावतीने शेखर डोर्लेकर यांनी काढले. भरतजीचे आयुष्य खडतर प्रवासातूनच सुरू झाले. अनेक संघर्ष त्यांनी केले परतु कुणाला दुखावले नाही हीच त्याच्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्याच्या पत्नीने म्हणजे उषाभाभीनेही त्यांना उत्तम साथ दिली आहे. यापूढेही आम्ही कायमच या कुटूंबासोबतच असू असं रंगकर्मी राम सारग यांनी श्री देव महापुरुष भजन मंडळाच्या वतीने नमूद केले. निवृती नंतरचे आयुष्य कुटूंबातील सर्वाशी आनंदात घालवण्यासाठी द्यावा व उरलेल्या आयुष्यात राहून गेलेले सुख प्राप्त करावे, असे भावनिक शुभेच्छा राजेंद्र यादव यांनी दिल्या. तर भरत हे तळागाळातील एक सामान्य व्यक्तीमत्व आहे पण उच्चं विचारसरणी व सर्वासाठी झटणारा एक देवमाणूस आहे आणि पुढिल वाटचाल ही ते आदर्शच ठेवतील असे ठाम उद्गगार उदय बने यांनी काढले.

टाइम्स स्पेशल

माझा या पूर्वी कधीही संबध आलेला नसतानाही आज एका निगर्वी निस्वार्थी सामाजिक बांधिलकी जपणार्या व सर्वाशीच प्रेमळ असणार्या समाजासाठी झटणार्या व समाजासाठी प्रेरणादायी असणार्या या देवमाणूस श्री भरत नाटेकर यांच्या या कार्यक्रमाला मला बोलावून जो मान दिलात त्या बद्दल खरंच खूप धन्यवाद देताना एक वेगळाच आनंदही होतो आहे. त्यांच्या जीवनात यापूढे सुखसमृध्दी व दिर्घायुष्य लाभो असे भावनिक उद्गगार नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांनी काढले. यावेळी विजय आडविरकर, त्यांची मुलगी सायली, नयना नाटेकर, यांनी शुभेच्छापर आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वतीसाठी श्री महापुरुष भजन मडळ व मैत्री ग्रुप गावडे आबेरे या मंडळाच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी शेकडो समाज बांधव व मित्र परिवार उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वासुदेव वाघे यांनी मानले व उपस्थित सर्वाचे आभारही मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg