loader
Breaking News
Breaking News
Foto

महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरामध्ये पोलिसांचा रूट मार्च

पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष मतदान १५ जानेवारी आणि १६ जानेवरी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या करीता कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सदर रूट मार्च पोलीस ठाणे येथे सुरू होऊन स्वामी नित्यानंद मार्गावरून पनवेल महानगरपालिका मुख्यालय- मौलाना अब्दुल कलाम आझाद चौक- एमजी रोड- मिरची गल्ली नाका -टपाल नाका - कर्नाळा भाजी मार्केट सर्कल- छत्रपती शिवाजी महाराज चौक- आदर्श हॉटेल चौक -लाईन आळी- दांडेकर रुग्णालयासमोरून गावदेवी पाडा मार्गे -व्हिके हायस्कूल येथे समाप्त झाला. रूटमार्च नंतर व्ही.के.हायस्कूल येथे निवडणूक बंदोबस्त करीता नेमलेल्या अधिकारी, अंमलदार व होमगार्ड यांना पवन चांडक, निवडणूक निर्णय अधिकारी, प्रभाग क्र.१७,१८,१९,२०, व भाऊसाहेब ढोले, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, पनवेल, वपोनि नितीन ठाकरे यांनी मतदान दिवशीच्या बंदोबस्ताचे तसेच मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाशित करण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकांचे वाटप देखील बंदोबस्तावरील सर्व अधिकारी, अंमलदार व होमगार्ड यांना करण्यात आले आहे. बंदोबस्ताच्या अनुषंगाने उपस्थित अधिकारी, अंमलदार, होमगार्ड यांच्या सूचना समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. रूट मार्च व मार्गदर्शनानंतर बंदोबस्तावरील ०८ अधिकारी, ११० पोलीस अंमलदार व ८० होमगार्ड हजर होते त्यांना आपापल्या बंदोबस्ताचे ठिकाण व्यवस्थितरित्या समजावून सांगण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg