loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत २३ जाने.पासून भव्य ‘संविधान चषक- २०२६’ क्रिकेट स्पर्धा

रत्नागिरी (वार्ताहर) - भिम युवा पँथर रत्नागिरी (रजि.) च्यावतीने दि. २३ जाने. ते दि. २६ जाने. या कालावधीत ‘संविधान चषक’ भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भिम युवा पँथर या संस्थेचे क्रिकेट स्पर्धा भरविण्याचे हे दुसरे वर्ष आहे. मागील क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. संस्थेच्यावतीने क्रिकेट स्पर्धेतून जमा झालेल्या रक्कमेतून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यावर्षी दोन मोठे सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे अध्यक्ष प्रितम आयरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २००० रूपये प्रवेश फी असणार आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक २६ हजार व आकर्षक चषक, व्दितीय पारितोषिक १६ हजार रूपये व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व सामनावीर अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर स्पर्धा रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडासंकुल, आठवडा बाजार, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी इच्छूक संघानी नावनोंदणीसाठी समीर जाधव- ९५६१६५३०८९, नरेश कांबळे-७४०००२६६७८, प्रतिक कांबळे- ९१७५०५५०२५, सुजित चवेकर-८६०५२७०२३१, प्रविण पवार- ८६९८९८१६१६, समीर पवार-८००७३१३५०१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भिम युवा पँथर संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg