loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली आयोजित वीर जवान दौड मॅरेथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी : सैनिक स्कूल आंबोली यांच्यावतीने आयोजित वीर जवान दौड या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेला सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या विविध भागातून ४०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. मोती तलावाच्या काठावरील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ पार पडला. आरोग्य व क्रीडा संस्कृतीला चालना देणारी ही मॅरेथॉन स्पर्धा भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करणार्‍या सैन्य दलातील वीर जवानांना समर्पित करण्यात आली. विविध वयोगटातील एकूण सात प्रकारात विभागली गेली होती. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्पर्धेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आली. राष्ट्रगीतानंतर सैनिक स्कूलचा सिनियर कॅडेट अथर्व पालव याने सर्व स्पर्धकांना शाळेच्यावतीने शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

क्रीडा शिक्षक मनोज देसाई यांनी स्पर्धेच्या नियमावलीचे वाचन केले. ही स्पर्धा १०, १४, १७ वयोगटातील मुले/मुली व खुला वयोगट अशा विविध वयोगटात घेण्यात आली. विविध वयोगटातील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, पदक, प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोसले, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, कर्नल विजयकुमार सावंत व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सैनिक स्कूलचे अध्यक्ष सुनील राऊळ, सचिव जॉय डोन्टस, सैनिक पतसंस्था चेअरमन बाबुराव कविटकर, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगरसेविका दिपाली भालेकर, सुनीता पेडणेकर, शर्वरी धारगळकर ,स्नेहा नाईक ,डॉ.स्नेहल गोवेकर, कॅथलिक पतसंस्थेच्या संचालिका डिसोजा, सैनिक स्कूलचे प्राचार्य नितीन गावडे, निवृत्त प्राचार्य सुरेश गावडे, क्रीडा शिक्षक शैलेश नाईक, सैनिक पतसंस्था उपमहाव्यवस्थापक प्रल्हाद तावडे, सैनिक स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सैनिक पतसंस्था कर्मचारी, सिंधुदुर्ग जिल्हा जुडो कराटे असोसिएशनचे सदस्य व सावंतवाडीतील क्रीडा रसिक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

सूत्रसंचालन एस.के. गावडे व क्रीडा शिक्षक शैलेश नाईक यांनी केले. आर्या क्लिनिक सावंतवाडीच्या डॉक्टर सुनिता म्हाडगूत व भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक कॉलेज यांनी सदर स्पर्धेसाठी वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल आयोजकांतर्फे सन्मान करण्यात आला. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे १० वर्षाखालील मुले- प्रथम- स्वराज संदीप सावंत, द्वितीय -सर्वेश संतोष कापडी, तृतीय- निर्मय संतोष रेडकर १० वर्षाखालील मुली- प्रथम -हिंदवी जयराम दळवी, द्वितीय- स्पृहा भूषण नार्वेकर, तृतीय- काव्या अर्जुन राऊळ १४ वर्षाखालील मुली- प्रथम -अनन्या दीपक कुंभार, द्वितीय -आस्था अमित लिंगवत, तृतीय- श्रावणी भिवा महाडेश्वर १४ वर्षाखालील मुले- प्रथम- वेदांत युवराज पाटील, द्वितीय -भावेश संतोष यादव, तृतीय- वेदांत विनायक भोपळे १७ वर्षाखालील मुल- प्रथम- जयेद समीर शेख, द्वितीय- सुनील बाबुराव जंगले, तृतीय- यश प्रकाश कडव महिला खुला गट- प्रथम- मेघा प्रमोद सातपुते, द्वितीय- रेश्मा रावबा पांढरे, तृतीय- तेजस्वी भरत गावडे पुरुष खुला गट- प्रथम -ओमकार विष्णू बैकर, द्वितीय -आदित्य आनंद राऊळ, तृतीय- ओम उन्हाळकर यांसह उपस्थित स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली आहेत, असे सैनिक स्कूलचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

राज्यभरातून स्पर्धक सहभागी

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg