loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, देऊडचा 17 जानेवारीला रौप्य महोत्सव

रत्नागिरी : करजुवे पंचक्रोशी शिक्षण संस्था करजुवे तालुका संगमेश्वर संचलित श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, देऊड तालुका रत्नागिरी या विद्यालयाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शनिवार दि. 17 जानेवारी 2025 रोजी रौप्य महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी प्राचार्य शशिकांत नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, चिपळूण संगमेश्वर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा क्रीडाअधिकारी विजय शिंदे, पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर उपस्थित राहणार आहेत. तसेच श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघ, देऊड मधील ग्रामस्थ त्याचबरोबर आजी-माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्मरणिका प्रकाशन, त्याचबरोबर देणगीदार, मान्यवर व गुणवंतांचा सत्कार सत्कार, शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन व श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघ व सांस्कृतिक कलामंच निर्मित दोन अंकी सामाजिक नाटक ‘अति पण किती ’ हा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी या दिमाखदार व संस्मरणिय कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रौप्यमहोत्सव समितीकडून करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg