loader
Breaking News
Breaking News
Foto

पोस्टल सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संगमेश्वरमध्ये जनजागृती रॅली

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - पोस्टल सेवा जनसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचाव्यात, तसेच बचत आणि सुरक्षित गुंतवणुकीबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने संगमेश्वर पोस्ट कार्यालयाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली संगमेश्वर बस स्थानकापासून बाजारपेठमार्गे पोस्ट कार्यालयापर्यंत काढण्यात आली. रत्नागिरी डाक विभागाचे अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढण्यात आली. या रॅलीत पोस्टल कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीचे मार्गदर्शन पोस्टमास्तर संतोष गवंडी यांनी केले. यावेळी पोस्टल असिस्टंट रवींद्र घडशी यांचीही उपस्थिती होती. “ठेव ‘सुरक्षे’साठी व ‘बचती’साठी” या घोषवाक्याखाली रत्नागिरी डाक विभागाची विशेष मोहीम यानिमित्ताने जनतेसमोर मांडण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात भविष्याची तरतूद, मुलांचे शिक्षण, तसेच वृद्धावस्थेतील जबाबदाऱ्या यासाठी बचत अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बचत सुरक्षित असून नियमित परतावा देणारी असावी, या दृष्टीने पोस्ट खात्यातील विविध योजना अत्यंत विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय असल्याचे पोस्टल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जनतेला बचतीचे विविध लाभ मिळावेत या उद्देशाने दिनांक 19 जानेवारी 2026 ते 24 जानेवारी 2026 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयांमध्ये “Special POSB Drive” राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान जास्तीत जास्त नवीन खाती उघडण्यावर भर दिला जात आहे. 10 वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी (SSA) खाते, गरजेनुसार विविध मुदतीसाठी टाईम डिपॉझिट, आवर्ती खाते, PPF खाते अशा अनेक आकर्षक आणि लाभदायक योजना डाक खात्यामार्फत उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

टाइम्स स्पेशल

माहे डिसेंबर 2025 अखेर रत्नागिरी डाक विभागात एकूण 10,91,277 चालू खाती असून, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एप्रिल 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत 1,25,520 नवीन POSB खाती उघडण्यात आल्याची माहिती देण्यात आली. परताव्याची नियमितता आणि पैशांची सुरक्षितता याबाबत डाक खात्याचे स्थान कायमच अग्रणी राहिले असून, सर्व नागरिकांनी या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी डाक विभागाचे अधीक्षक डी. एस. कुलकर्णी यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg