loader
Breaking News
Breaking News
Foto

वडखळ पोलीस ठाण्यात धक्कादायक हिंसाचार; सीसीटीव्ही फोडून पोलिसांवर हल्ला, आरोपी अटकेत

संगलट, खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील वडखळ पोलीस ठाण्यात घडलेल्या हिंसक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील मच्छटी येथील २८ वर्षीय अनिशकुमार फुल्लन राम याने रागाच्या भरात पोलीस ठाण्यात प्रवेश करून प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या कानशिलात मारत हाताहात संघर्ष केला. यावेळी शासकीय कर्मचार्‍यांवर धक्काबुक्की करत सीसीटीव्ही कॅमेरा दगड मारून फोडल्याने पोलीस ठाण्यातील कामकाज काही काळ ठप्प झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत फिर्यादी पोलीस हवालदार अतिक्षा अतिश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आधारकार्ड हरवल्याच्या तक्रारीबाबत चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आला होता. आधारकार्ड पोलीस ठाण्यात उपलब्ध नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपीने बाहेर जाऊन पोलीस ठाण्याच्या गेटवरील सुमारे १ लाख २५ हजार रुपये किमतीचा शासकीय सीसीटीव्ही कॅमेरा दगड मारून फोडत शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. त्यानंतर आरोपीने प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव, फौजदार भाग्यवान कांबळे व पोलीस शिपाई रामनाथ ठाकुर यांच्यावर हल्ला करून शासकीय कामकाजात अडथळा आणला.

टाईम्स स्पेशल

आरोपीला १२ जानेवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली असून, वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलीस ठाण्याच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg