loader
Breaking News
Breaking News
Foto

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून गुजरातमध्ये ३१२ कुटुंबे पुन्हा हिंदू धर्मात

वलसाड - जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून गुजरातमध्ये ३१२ कुटुंबे पुन्हा हिंदू धर्मात आली आहेत. वलसाडमधील हनुमतमाळ, (ता. धरमपुर) येथे झालेल्या सोहळ्यामध्ये या सर्वांना विधीवत प्रवेश देण्यात आला. आत्तापर्यंत १,५३,३४३ कुटुंबांनी हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. वेगवेगळी आमिषे दाखवल्याने वा फसवून अन्य धर्मात ही कुटुंबे गेली होती. हनुमंतमाळ येथे झालेल्या सोहळ्यात या ३१२ कुटुंबांना विधिवत पुन्हा सनातन हिंदू धर्मात घेण्यात आले. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली येथे हा सोहळा झाला. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आजपर्यंत १,५३,३४३ लोकांनी हिंदू धर्म पुनर्प्रवेश केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबतची माहिती अशी - हिंदू धर्मबांधवाना सुनियोजित षड्यंत्राद्वारे विविध आमिषे दाखवून, भुलथापा देऊन, त्यांच्या अज्ञानाचा, गरिबीचा गैरफायदा घेऊन, त्यांचे धर्मांतरण करण्यास भाग पाडले जात आहे. अशा धर्मांतरीत हिंदूंना उपरती होऊन पुन्हा हिंदुधर्मात येण्याची इच्छा असते. अशा हिंदू धर्मात घरवापसी करणाऱ्या कुटुंबांना पुन्हा विधिवत धर्मप्रवेश देण्याचे महाअभियान जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जात आहे. या कार्यक्रमाप्रसंगी धरमपूरचे आमदार अरविंदभाई पटेल, अहवा डांग चे आमदार विजयभाई पटेल, उमरगांचे आमदार रमणभाई पाटकर, जिल्हा महामंत्री महेंद्र चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुनर्प्रवेश कार्यक्रमाचे तीन तास विधी सुरू होते. त्यात गोमाता पूजन, होम हवन असे विधी झाले. या सर्व बांधवांना शपथ देण्यात आली. जगद्‌गुरूंनी ही शपथ दिली. ती अशी - यापुढे मी हिंदू धर्माची उपासना, रीतिरिवाज प्रथा परंपरा यांचे तंतोतंत पालन करेन. यापुढे मी अन्य धर्मात जाणार नाही. मी जन्माने हिंदू आहे आणि हिंदू म्हणून जगेन.

टाइम्स स्पेशल

सर्वांनी शपथ घेतल्यानंतर जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "मिशनरी वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून हिंदुधर्मीय लोकांचा बाप्तिस्मा करतात. त्यांचे धर्मांतर करून घेत आहेत. त्यातील बरीचशी मंडळी आदिवासी आहेत." "धर्मांतरण केलेल्या नागरिकांचे मूळचे नाव बदलत नाहीत. तसेच त्यांची जात आणि धर्म सोयीसुविधा मिळण्यासाठी न बदलता त्यांचे ख्रिश्चनीकरण करण्याचे काम सुरू आहे. ज्या लोकांना हिंदू धर्मातील उपासना पद्धती बदलल्यामुळे अपराधी वाटत होते, ते आम्हाला येऊन भेटले. म्हणून आम्ही आता त्यांना पूर्वीची उपासनापद्धती सुरू करून दिली आहे."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg