loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र राज्यात प्रत्येक गावागावात हिंदू जनजागृती होणे काळाची गरज - दिनेशदादा पाटील

रसायनी (राकेश खराडे) - अखिल आर्यवत संघ, राष्ट्रीय बजरंग दलातर्फे अयोजित विराट हिंदू एकता संमेलन पोद्दार समृद्धि क्लब हाऊसमध्ये आंतरराष्ट्रीय बजरंग दल संस्थापक अध्यक्ष दिनेशदादा पाटील यांच्या नेतृत्वात शनिवारी सायंकाळी उशिरा पार पडले. यावेळी आंतराष्ट्रीय बजरंग दल रसायनी खालापूर, रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हनुमान चालीसा मंत्रजप, सुंदरकांड, महाआरती, श्री राम नाम भजन, तर विद्यार्थी वर्गातील लहान मुलांसाठी प्रश्नोत्तरे असे विशेष नियोजन बद्द कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यांना सन्मानपत्र व पारितोषिक देवून कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी प्रश्नोत्तरे स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या व सहभागी विद्यार्थ्यांना दिनेशदादा पाटील याच्यांहस्ते प्रमाणपत्र देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी व्यासपीठावरून दिनेशदादा पाटील बोलत होते की, या देशातील हिंदू जागृत होत आहे. हिंदूना जागृत करण्यासाठी राष्ट्रीय बजरंगदल गाव, वाड्या-वस्त्यांवर बजरंग दलाचे कार्यकर्ते नागरिकांत जाऊन जनजागृती करत आहेत. बदलापूर येथे ठेवण्यात आलेला हा कार्यक्रम देखावा किवा शोभेसाठी ठेवलेला नसून तो हिंदू बांधवाना एकत्रित आणण्यासाठी असून हि तर एक चिंगारी आहे, असे कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात प्रत्येक गावा-गावात होणे आज काळाची गरज बनली आहे. असे कार्यक्रम गावोगावी ठेवण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते यांकडे पैसेच पाहिजे असावेत असे काही नाही. सर्व हिदूंनी एकत्रित आल्यास उत्तम प्रकारे जनजागृती होऊन अतिशय सुलभ होणारी आहे. हिंदूनी अयोध्येत बाबरी मस्जिद तोडली, त्यावेळेस हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः ठाम भुमिका घेतली कि ती बाबरी मस्जिद आम्ही हिंदूनी तोडली आहे. असे सांगणारे व जबाबदारी स्विकारणारे देशातील एकमेव बाळासाहेब ठाकरे होते. असे उपस्थित जनसमुदायास प्रबोधन करत असताना अंतरराष्ट्रीय बजरंग दल संस्थापक अध्यक्ष दिनेशदादा पाटील बोलत होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी कोकण प्रांत मंत्री सचिन धुळे, ठाणे जिल्हा मंत्री विशाल जैस्वाल, रायगड जिल्हा अध्यक्ष बाबू भोईर, मावळ लोकसभा अध्यक्ष राकेश खराडे, उरण विधानसभा अध्यक्ष जनार्दन मालुसरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष सुरज (बादशाह), ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राकेश टेंबे, ठाणेसह जिल्ला मंत्री चेतन जामगरे, कृश कमुनी पोद्दार संपर्क प्रमुख, वांगणी शहराध्यक्ष महेंद्र भाई, रायगड गोरक्षा प्रमुख मलेश गुडसे, शेलू शहराध्यक्ष भरत भाई, खालापूर तालुकाध्यक्ष प्रशांत तांबोळी, कर्जत तालुकाध्यक्ष केवल भाई, प्रदीप गुप्ता, दुर्गाशक्ती पोद्दार समृद्धी प्रिया जैसवाल अध्यक्ष, उपाध्यक्ष साधना सिंह, कुशी सिंह, प्रदीप गुप्ता, अंतरराष्ट्रीय बजरंग दल दुर्गाशक्ती ठाणे जिल्हा अध्यक्ष, राणी राजेश जवळेकर, जैस्वाल ठक्कर, आदिसह पदाधिकारी व बजरंगी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg