loader
Breaking News
Breaking News
Foto

दिल्लीत महाराष्ट्र लोकसंस्कृतीचा जागर

वरवेली (गणेश किर्वे) - देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग येथील 'नवीन महाराष्ट्र सदन' येथे आयोजित तीन दिवसीय ‘मकर संक्रांती महोत्सव’ आणि ‘हुरडा पार्टी’चा सांगता सोहळा महाराष्ट्राच्या गौरवशाली सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणाने अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. ९ ते ११ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या महोत्सवाला दिल्लीकर आणि उत्तर भारतातील मराठी बांधवांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. महोत्सवाच्या सांगता समारंभा दिवशी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विद्यमाने आणि नवी मुंबई येथील जालगावकर आर्ट्स संचलित ‘महाराष्ट्र लोकसंस्कृती’ या विशेष सांस्कृतिक सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली. सिद्धेश विलास जालगावकर यांची निर्मिती आणि नृत्य दिग्दर्शन असलेल्या या कलाविष्काराची सुरुवात ‘स्वस्ती श्री’ आणि ‘मोरया’ या वंदनेने झाली, तर ‘विठू माऊली तू’ आणि ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगांनी वातावरणात भक्तीरस निर्माण केला. या सोहळ्यात लावणी, धनगरी नृत्य, गोंधळ, पोतराज आणि कोळी नृत्यांच्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेषतः 'चंद्रा', 'वाजले की बारा' आणि 'पतंग उडवीत होते' यांसारख्या प्रसिद्ध लावणी गीतांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. दादा कोंडके यांच्या अजरामर गीतांनी कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. या संपूर्ण सोहळ्यात ४८ कलाकारांच्या चमूने आपल्या कलेचा आविष्कार सादर केला. महोत्सवाचा शेवट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवार्थ सादर केलेल्या गीतांनी झाला, ज्यामध्ये स्वतः सिद्धेश विलास जालगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तेजस्वी भूमिका साकारून उपस्थितांना भारावून टाकले. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण महाराष्ट्र सदन परिसर दुमदुमून गेला होता.

टाइम्स स्पेशल

यशस्वी सोहळ्यानंतर निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी महोत्सवाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशिल गायकवाड, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे, उपअभियंता किरण चौधरी, आशुतोष द्विवेदी, सुरक्षा अधिकारी अनिल चोरगे यांच्यासह सदन व परिचय केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली, त्याबद्दल आयुक्तांनी सर्वांचे आभार मानले. तसेच या आयोजनात सहभागी झालेले कृषी विभाग व उमेद गटातील सर्व सदस्य, फाईन लाईन आर्ट अकादमी, सांस्कृतिक कार्यक्रमाचे निर्माता व नृत्य दिग्दर्शक सिद्धेश विलास जालगावकर, अभिषेक गडेकर, रुपाली पाटील, संकेत चव्हाण, प्रशांत मेस्त्री, श्वेताल, ढोलकीच्या तालावर फेम, भैरवी मिस्त्री, नेहा बैरागी, महेश मासोन व इतर सहकारी ४८ कलाकार व तंत्रज्ञ आणि या महोत्सवाला उदंड प्रतिसाद देणाऱ्या दिल्लीकर जनतेचे त्यांनी विशेष आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg