loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री देव रामेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी मेढ्यात तयारी

मालवण (प्रतिनिधी) : कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व किल्ले सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्रैवार्षिक भेट सोहळा २३, २४ आणि २५ जानेवारी या कालावधीत होणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मेढा येथील जोशी वाडा परिसरात देवाचे आगमन होणाऱ्या जागेची विशेष स्वच्छता आणि सपाटीकरण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भक्तांच्या सोयीसाठी आणि भव्य मंडप उभारण्यासाठी या जागेची दुरवस्था दूर करणे आवश्यक होते. भाविकांच्या मागणीची दखल घेत जेसीबीच्या साहाय्याने माती टाकून संपूर्ण जागेचे सपाटीकरण करण्यात आले. तसेच परिसरातील कचरा हटवून साफसफाई करण्यात आली. या सोहळ्या दरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजित जागेजवळील नाला साफ करणे आणि परिसरात पुरेसा प्रकाश राहण्यासाठी एलईडी लाईट्स लावण्याची मागणी मालवण पालिकेकडे करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

या सर्व कामांच्या वेळी स्थानिक नगरसेविका मेघा गावकर, विद्या फर्नांडिस, राजा गावकर, विशाल आचरेकर, बाबा जोशी, काका जोशी, प्रशांत केळुसकर, अंकित जोशी, दादा जोशी, त्रिजय तांडेल आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री देव रामेश्वराच्या या पालखी सोहळ्यासाठी मेढावासीय सज्ज झाले असून प्रशासनाकडूनही सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg