loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना ,मनसे मध्ये आनंदाचे वातावरण - जि. प. पं. स. निवडणुका जिंकणारच - आम. भास्कर जाधव

आबलोली (प्रतिनिधी) राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर प्रत्येक आमदार, खासदार आपापल्या मतदारसंघांमध्ये मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत आहेत.याच पार्श्वभूमीवर गुहागर विधानसभेचे आमदार भास्कर जाधव आज वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या बैठकीसाठी कोतळूक येथे आले असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केलं की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे नेते एक झाल्यावर महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचे वातावरण आहे तसेच महाराष्ट्रामध्ये सर्वच जाती-धर्माच्या लोकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने गुहागर मध्ये देखील प्रमोद गांधी आणि मी देखील एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. शिवसेना मनसे मध्ये आनंदाचे वातावरण असून येत्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुका आम्ही जिंकणारच असा विश्वास पत्रकारांशी बोलताना गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वेळणेश्वर गटाची बैठक जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तालुका प्रमुख सचिन बाईत यांनी कोतळूक येथे आयोजित केलेली होती. या बैठकीला वेळणेश्वर गटातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना आम.भास्कर जाधव पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषद वेळणेश्वर गटातून सिद्धी रामगडे या ग्रॅज्युएट झालेल्या आहेत. तिचे वडील संतोष रामगडे हे सुरुवाती पासून काबाडकष्ट करून हॉटेल व्यवसाय करतात. त्यांच्याकडे मोठी फौज आहे. त्याचबरोबर सिद्धी रामगडे यांना सोशल वर्किंग करण्याची प्रचंड आवड आहे. त्या उमेदवार म्हणून आम्ही निवडलेल्या आहेत. वेळणेश्वर पंचायत समिती गणासाठी उमेदवार म्हणून सचिन जाधव हे उमेदवार आम्ही निवडलेले आहेत त्यांनी आतापर्यंत पक्षाचे काम प्रामाणिकपणे केलेले आहे ते स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक नव्हते परंतु दिवस रात्र पक्षाकरता धडपडणारा सकाळ, संध्याकाळ प्रत्येकाच्या उपयोगी पडणारा कुठलीही गरज भासली तर त्या ठिकाणी धावून जाणारा असा सक्षम कार्यकर्ता आम्हाला उमेदवार म्हणून हवा आहे अशी मागणी त्यांच्या गणातील कार्यकर्त्यांची असल्यामुळे आम्ही त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तीसर्‍या ज्या उमेदवार आहेत त्या ओपन जागेवर पिंपरचे उपविभाग प्रमुख निखिल मोरे यांच्या सौभाग्यवती यांना आम्ही उमेदवारी जाहीर केली आहे. अशी माहिती आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg